Terror Attack Conspiracy: सतर्क व्हा! भारताला हादरा देण्यासाठी दहशतवाद्यांचं 'मिशन 15 ऑगस्ट'

कोणत्या हत्यारांचा वापर होऊ शकतो? 

Updated: Aug 4, 2022, 07:51 AM IST
Terror Attack Conspiracy: सतर्क व्हा! भारताला हादरा देण्यासाठी दहशतवाद्यांचं 'मिशन 15 ऑगस्ट' title=
Terror Attack Conspiracy pakistan IED PoK India

Pakistan terror threat: भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आलेला असतानाच दहशतवादी संघटनाही कटकारस्थान रचू लागल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. याच यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार (Indipendence Day) स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवादी देशात विविध ठिकाणी प्राणघातक हल्ले घडवण्याचा कट आखत आहेत. (Terror Attack Conspiracy pakistan IED PoK India)

हल्ले घडवून आणण्यासाठी ते कार, ट्रकवर स्टिकी बॉम्बचा वापर करु शकतात. सर्वात मोठी आणि खळबळजनक माहिती म्हणजे दहशतवादी एकाहून अधिक ठिकाणी हल्ले घडवण्याचा मनसुबा ठेवून आहेत. 

देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस जवळ येत असतानाच सीमा भागातही हालचाली वाढल्या आहेत. परकियांची घुसखोरी रोखण्यासाठी क्षणोक्षणी सतर्क राहण्याचे निर्देश गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आले आहेत. 

कोणत्या हत्यारांचा वापर होऊ शकतो? 
मोठे स्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब हल्ले आणि आग भडकवणारे मोलोटोव कॉकटेल यांचा वापर दहशतवादी करु शकतात. लेटर आणि पार्सल बॉम्बचाही ते वापर करु शकतात. 

नससंहार करण्यासाठी दहशतवादी अत्याधुनिक बंदुक, पिस्तुल, रिव्हॉल्वर, रायफल आणि स्वयंचलित हत्यारांचा वापर करु शकतात. दहशतवाद्यांकडून आरपीजीचाही वापर केला जाऊ शकतो. 

ड्रोन हल्ल्याचीही शक्यता 
गुप्तचर यंत्राणांनी भारतामध्ये ड्रोन हल्ले होणार असल्याची भीतीही व्यक्त केली आहे. यासाठी दहशतवादी सीमेलगतचा भाग निशाण्यावर ठेवू शकतात. पाकव्याप्त काश्मीरमधून हे कटकारस्थान केलं जाऊ शकतं. 

दहशतवादी हल्ल्यांचं सावट पाहता देशातील सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या धर्तीवर रेल्वे स्थानकं, पर्यटनस्थळं, ऐतिहासिक वारसा असणाऱ्या वास्तू या सर्व ठिकाणांवर मेटल डिटेक्टरच्या सहाय्यानं ये-जा करणाऱ्यांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. शिवाय सर्व हालचालींवरही नजर ठेवण्यात येत आहे.