जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद

जम्मू-कश्मीरमध्ये सेनेच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. जवानांचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात असतांना जम्मू-श्रीनगर हायवेवर काजीगुंड जवळ दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

Updated: Jun 3, 2017, 01:34 PM IST
जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद title=

श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये सेनेच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला आहे. जवानांचा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात असतांना जम्मू-श्रीनगर हायवेवर काजीगुंड जवळ दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. 

दहशतवादी हल्ल्यात १ जवान शहीद झाला आहे तर ५ जवान जखमी झाले आहेत. जवांना संपूर्ण भागाला घेरलं आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. गुप्तचर विभागाने हा इशारा दिला होता की लश्कर ए तैयबाचे दहशवतादी जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये मोठा हल्ला करु शकतात.