Thane Jail Prisoners Made Cake : ख्रिसमसचा सण (Christmas)आला की आपल्या ताजे ताजे केक, बिस्किट्स आणि चॉकलेट्स (Bakery Products) खायला आवडतात. त्यातून आपण कधी आपण हे केक आणि बेकरी प्रोडक्ट्स घरी बनवतो नाहीतर बाहेरून मागवतो. त्यासाठी आपण आपल्या आप्तांनाही विचारतो की, तुमच्या ओळखीत कुठे चांगली बेकरी आहे का, परंतु कदाचित तुमच्या ओळखीतलं कोणी ठाणे मध्यवर्ती कारागृहातही केक मिळतात असं सांगितलं तर... घाबरून जाऊ नका तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकणार नाही तर तुम्हाला जेलमध्ये केक्सची (Cakes) ऑर्डर देण्यासाठी जावं लागेल. हो, या कारागृहात चक्क कैद्दी त्यांच्या हाताने केक बनवतात आणि ग्राहकांना विकतात. या कारागृहातून चक्क इथल्या प्रशासनाला लाखोंचे उत्पन्नही मिळालं आहे.
आपल्याला कायमच चांगल्या प्रतीचे डेकोरेट (Decorated Cakes) केलेले केक्स आणि बेकरी प्रोडक्ट्स खायला आवडतात. आपण कधी दुसरीकडे बघतही नाही. फार फार तर आपण घरगुती पद्धतीनं तयार केलेले केक खातो. याचाच अर्थ आपल्याला घरगुती प्रकारे बेकरी प्रोडक्ट्सही आवडतात. त्यामुळे आपण ते आवडीनं खातो. परंतु येथे चक्क ग्राहक मोठ्या संख्येने येऊन केक विकत घेत असल्याची माहिती समोर आली आहे. येथे कच्चा माल आणला जातो आणि इकड्याच्या कैद्यांकडून सगळं काही बनवून घेतलं जातं. काही मदतनीसही असतात, अशी माहिती कळते.
आतापर्यंत आपण नामांकित कंपन्यांच्या प्रसिद्ध उत्पादनांना सर्वसामान्य ग्राहकांमध्ये (Prisoners Making Cake) मागणी पाहिली असेलच पण तुरुंगातील कैद्यांनी बनवलेले पदार्थही लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. खास करून कारागृहातील कैद्यांनी बनवलेला केक सर्वसामान्यांना एवढा आवडला आहे की यावेळी ख्रिसमस आणि नवीन वर्षात या केकच्या विक्रीने विक्रम मोडला आहे. तब्बल 10 लाखांचे उत्पन्न यातून मिळाले जेल प्रशासनानला मिळाले आहे.
हेही वाचा - Rakhi Sawant Affairs: राखीचं नशीबचं फुटकं? आधी पाचवेळी प्रेमभंग मग दोनदा लग्नं
सामान्यत: कारागृह प्रशासन ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना भविष्यात स्वावलंबी बनवण्यासाठी नवनाविन संकल्पना राबवित असते आणि त्यांच्या हाताला काम देत विविध उत्पादने तयार करण्यास प्रवृत्त करते.याच संकल्पनेतून बेकरी उत्पादने (Thane Central Jail) त्यांच्याकडून तयार करण्यात येऊ लागली. यात प्रामुख्याने ब्रेडस, लादी पाच, बिस्किटे आणि मावा केक्स हे प्रामुख्याने बनवण्यात येऊ लागले. आता हे कैदी सर्व प्रोडक्टस इतके खास बनवतात की आज या कैद्यांची उत्पादने सर्वसामान्य ग्राहकांची एकदम खास पसंतीची बनली आहेत. सकाळी इथल्या वस्तू विक्री केंद्रात ग्राहक ऑर्डर नोंदवून जतात आणि संध्याकाळी कैद्यांनी बनवलेले ताजे ताजे केक घेऊन जातात.