अमरनाथ हल्ल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतावाद्यांचा शोध संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलाय. लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंगऑपरेशनमध्ये बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.

PTI | Updated: Jul 12, 2017, 08:16 AM IST
अमरनाथ हल्ल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन, ३ दहशतवाद्यांना कंठस्नान title=

जम्मू : अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरच्या हल्ल्यानंतर फरार झालेल्या दहशतावाद्यांचा शोध संपूर्ण काश्मीरमध्ये सुरू करण्यात आलाय. लष्कर आणि पोलिसांनी सुरू केलेल्या कोम्बिंगऑपरेशनमध्ये बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय.

काल रात्री उशिरा सुरक्षा यंत्रणांना बडगाम जिल्ह्यातल्या एका खेड्यात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. कोबिंग ऑपरेशन करत असतानाच झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. घटनास्थळावरून काही हत्यारं आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय.