नवी दिल्ली : हनीप्रीतच्या अडचणी कायम आहेत. दिल्ली हाईकोर्टाने हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे हनीप्रीतला अजून दिलासा मिळू शकलेला नाही.
साध्वींवर बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या शिक्षेनंतर त्याची दत्तक घेतलेली मुलगी हनीप्रीत गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलिसांनी तिच्या विरोधात अटक वॉरंट देखील जारी केलं आहे.
हनीप्रीतचा शोध सुरु आहे. हनीप्रीत ही दिल्लीमध्येच असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. हनीप्रीतचा वकील प्रदीप अरीया यांनी सांगितलं की दिल्लीतील त्यांच्या ऑफिसमध्ये जामीन अर्जावर हनीप्रीतने सही केली. त्यामुळे हनीप्रीत ही दिल्लीतच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.