आजपासून पैशांसंदर्भातील या गोष्टी बदलल्या, वापरण्यापूर्वी हे वाचा...

नव्या वर्षाची सुरूवात होताना सामन्यांच्या जीवनात काही बदल होता. नवी सुरूवात करताना काही नव्या गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजचे असते.  २०१८ मध्ये अनेक मोठ्य़ा गोष्टींमध्ये बदल झाले आहे. अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर फरक पडणार आहे. 

प्रशांत जाधव | Updated: Aug 11, 2018, 09:01 PM IST
आजपासून पैशांसंदर्भातील या गोष्टी बदलल्या, वापरण्यापूर्वी हे वाचा... title=

नवी दिल्ली : नव्या वर्षाची सुरूवात होताना सामन्यांच्या जीवनात काही बदल होता. नवी सुरूवात करताना काही नव्या गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजचे असते.  २०१८ मध्ये अनेक मोठ्य़ा गोष्टींमध्ये बदल झाले आहे. अशा गोष्टी ज्यामुळे तुमच्या रोजच्या आयुष्यावर फरक पडणार आहे. 

यात बँकिंगपासून शॉपिंगपर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. या संदर्भातील गोष्टींची तुम्हांला वापर करण्यापूर्वी माहिती नसेल तर तुम्हांला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. झी २४ तासची वेबसाईट 24taas.com अशा काही गोष्टी सांगणार आहेत त्यामुळे तुमचे  नुकसान टळू शकते. 

घर बसल्या मोबाईल सिम आधारशी लिंक करा... 

१ जानेवारी २०१८ पासून तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल सिम आधारकार्डाशी लिंक करू शकणार आहेत. ही सुविधा १ डिसेंबर २०१७ पासून सुरू होणार होती. पण टेलिकॉम कंपन्यांची तयारी पूर्ण न झाल्याने एक महिना त्याना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता OTP आणि इतर पद्धतीने सिम कार्ड घर बसल्या आधारशी लिंक करू शकणार आहेत. 

डेबिट कार्डाने खरेदी स्वस्त झाली...

आजपासून डेबिट कार्डाने देवाण-घेवाण करताना लागणारा एमडीआर चार्जेसमध्ये बदल करण्यात आला आहे. या बदलामुळे डेबिट कार्डावर करण्यात येणारी खरेदी किंवा विक्री आता स्वस्त झाली आहे. एमडीआरचे नवीन दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. आरबीआयने एमडीआर चार्ज व्यापाऱ्याच्या टर्नओव्हरशी जोडला गेला आहे. त्यामुळे आता तुम्हांला एमडीआर भरावा लागणार नाही. 

MDR वर सरकार देणार सवलत

रिझर्व बँकेने एमडीआर चार्ज कमी केला आहे. मोदी सरकारने २००० पर्यंत करण्यात येणाऱ्या देवाण घेवाणीवर एमडीआर चार्जचा भार स्वतः उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ असा की २००० रुपयांपर्यंत तुम्ही सामनाची खरेदी केली तर तुम्हांला एमडीआर चार्ज द्यावा लागणार नाही. त्यामुळे सामान खरेदी करताना या गोष्टीची काळजी घेणे गरजे आहे आहे. 

आजपासून कार खरेदी करणे महागणार 

कार आणि बाईक  कंपन्यांनी किंमती वाढविल्याने कार आणि बाईक खरेदी महागणार आहे. मारुती कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेलच्या किंमती २२००० रुपये, फॉक्सवॅगनने २०००० रुपये, टाटा मोटर्स  आणि होंडाने २५००० रुपये आणि टोयोटा, स्कोडा आणि महिंद्राने ३ टक्के किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिरो मोटो कॉर्पने बाईकच्या किंमतीत ४०० रुपयांची वाढ केली आहे. 

नाही चालणार या बँकांचे चेक बूक 

एसबीआयमध्ये विलय झालेल्या बँकाचे चेकबूक आजपासून रद्दी झाले आहेत. तुम्ही त्या बँकांचे ग्राहक आहेत तर तुमचे जुने चेकबूक आता चालणार नाही. एसबीआयने नव्या चेकबूक घेण्याची मुदत ३१ डिसेंबर ठेवली होती. 

आज गोल्ड ज्वेलरीवर हॉलमार्किंग 

सरकारने १ जानेवारी २०१८ पासून १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेट ज्वेलरीवर हॉलमार्किंग करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना गोल्ड ज्वेलरीची शुद्धताची ओळख पटण्यात सहज होणार आहे. वर्ल्ड गोल्ड काऊंसिलने टप्प्यात हॉलमार्किंग करणे अनिवार्य करू इच्छित आहे. यात पहिल्यांदा भारतातील जगातील २२ शहरात हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात येणार आहे. यात मुंबई, दिल्ली, नागपूर, पाटणा या शहरांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ७०० शहरात आणि अंतीम टप्प्यात देशातील इतर शहारांमध्ये हे अनिवार्य करण्यात येणार आहे.