बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपने मुंसडी मारली आहे. सर्वच पक्षांनी कर्नाटकात ताकद झोकून दिली होती. भाजप आणि काँग्रेस मध्ये कांटे की टक्कर होती. जेथे काँग्रेस आपलं अस्तीत्व टिकवण्याचा प्रयत्न करत होती तेथे भाजप काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धवस्त करण्याच्या उद्देशाने निवडणुकीत उतरला होता. निवडणुकीत दोन्ही पक्षांकडून वैयक्तिक टीका देखील झाली. ज्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण आणखी तापलं.
कर्नाटकमध्ये पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की काँग्रेस निवडणुकीत पराभूत होईल. काँग्रेसच्या पराभवानंतर पंजाब, पुडुचेरी आणि परिवार म्हणजेच पीपीपी काँग्रेस बनेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टीकेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याला प्रत्त्यूतर देत मोदींना मोबाईल स्पीकर आणि एयरप्लेन मोड म्हटलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, 'मोबाईलमध्ये 3 मोड असतात. वर्क मोड, स्पीकर मोड आणि एरोप्लेन मोड. मोदी फक्त स्पीकर आणि एरोप्लेन मोडमध्ये असतात. ते कधी वर्क मोडमध्ये नसतात.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील कर्नाटक निवडणुकीत प्रचारासाठी उतरले होते. या दरम्यान यूपीच्य़ा अनेक बातम्या येत होत्या. ज्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सीएम योगींवर टीका करत म्हटलं, 'उत्तर प्रदेशची जनता आहे त्रस्त आणि कर्नाटकात योगी खोटं बोलण्यात व्यस्त'
राहुल गांधी कर्नाटकात प्रचारादरम्यान मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचं नाव व्यवस्थित संबोधित करु शकले नाही. यानंतर या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल यांच्यावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, 'मी काँग्रेस अध्यक्षांचा आव्हान देतो की त्यांनी हिन्दी, इंग्रजी किंवा त्यांच्या आईच्या मुळ भाषेत सरकारची कामं कागदात न पाहता 15 मिनिटं बोलून दाखवावं. कर्नाटकची जनमा निष्कर्ष स्वत:चं काढून घेईल. पंतप्रधान मोदींनी त्यांना विश्वेश्वरैया 5 वेळा बालून दाखवण्याचं आव्हान देखील दिलं.
निवडणुकीच्या प्रचारादरम्य़ान राहुल गांधींनी पहिल्यांदा आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचं कबूल केलं. त्यांनी म्हटलं की, जर 2019 मध्ये काँग्रेसचा विजय झाला तर मी पंतप्रधान बनण्यासाठी तयार आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान नाही बनणार असं देखील त्यांनी यावेली म्हटलं होतं.
सिद्धारमैया यांना एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांची रॅली म्हणजे कॉमेडी शो असल्याचं म्हटलं होतं. कर्नाटकात मोदी आणि शाह लोकप्रिय नाहीत. ते जेव्हा रॅली करतात तेव्हा ते कॉमेडी शो वाटतो असं देखील त्यांनी म्हटलं होतं.