पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...

पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

Updated: Jul 30, 2017, 03:08 PM IST
पेन्शन खात्याची माहिती देणार हे मोबाईल अॅप...  title=

मुंबई : पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीनं (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) नावाचं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

हे मोबाईल अॅप 'अटल पेन्शन योजने'चा (APY) लाभ घेणाऱ्यांसाठी लॉन्च करण्यात आलंय. या मोबाईल अॅपच्या मदतीनं अटल पेन्शन योजनेचे सबस्क्राईबर्स आपलं अकाऊंट स्टेटमेंट मोबाईल पाहू शकतील. यामुळे, खात्यात किती पैसा आहे हे समजण्यासोबतच इतर माहितीही तुम्हाला तुमच्या हातातल्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकेल. 

२२ जुलै २०१७ पर्यंत अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या जवळपास ५८ लाख आहे. हे सगळे सबस्क्राईबर्स आपल्या स्मार्टफोनवर 'गुगल स्टोअर'मधून 'NPS लाईट' हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करू शकतील. 

अॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पेन्शन अकाऊंट आधार नंबरलाही जोडावा लागेल.