नवी दिल्ली : भारतात विदेश कंपन्यांनी गुंतवणूक करावी म्हणून मोदी सरकार परदेशातील कंपन्यांना भारतात येण्यास आमंत्रित करत आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स सारख्या बलाढ्य देशांनी नाही तर एका छोट्या देशांने भारतात सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गुंतवणूक मॉरीशस करत आहे. रिजर्व्ह बँकच्या एका रिपोर्टमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार भारतात प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक(FDI)चा मोठा स्रोत मॉरीशस आहे. यानंतर अमेरिका आणि ब्रिटेनचं स्थान आहे.
मॉरीशस सारखा देश भारतात गुंतवणूकीच्या बाबतीत पहिल्या स्थानावर असणं हे आश्चर्यचकीत करणारं आहे. कारण टॅक्स हेवन मॉरीशसला हवालाच्या माध्यमातून भारतातील काळा पैसा पांढरा करण्याच्या बाबतीत मुळ देखील मानला जातो.
रिजर्व बँकेने शुक्रवार जारी केलेल्या रिपोर्टनुसार २०१६-१७ च्या एफडीआय रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार सिंगापूर आणि जपान भारतात गुंतवणूक करण्याच्या यादीत चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. भारतात एकूण परकीय गुंतवणूकीच्या २१.८ टक्के भाग हा मॉरीशसचा आहे.