कठोर आईचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

योग्य शिस्त लावणारे पालक हे कायमच शत्रू ठरतात. पण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Feb 24, 2018, 09:32 PM IST
कठोर आईचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई : योग्य शिस्त लावणारे पालक हे कायमच शत्रू ठरतात. पण 

Add Zee News as a Preferred Source

या पालकांचा त्यामागील हेतू अनेकदा मुलं सोडा पण घरातील मोठी मंडळी देखील समजून घेत नाही. आणि अशातच जर आई कडक शिस्तीची असेल तर ती कायम व्हिलन ठरते. 

अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला चांगली सवय लावत असते. त्याने तिला न विचारता 10 रुपये चोरले असतात. त्यामुळे ती त्याला रागावते, शिक्षा देते. 

पण आईने मुलाशी असं वागणं हे त्याच्या वडिलांना तर पटत नाहीच पण त्याच्या घरातील इतर मंडळी देखील तिला विरोध करतात अशावेळी घरातील महत्वाची व्यक्ती म्हणजे त्या मुलाचे आजोबा त्या आईच्या पाठीशी उभे राहतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओतून कळत नकळत लोकांची कान उघाडणी केली आहे. 

 

About the Author

दक्षता ठसाळे-घोसाळकर

"दक्षता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड, सोशल स्टोरीज, लाइफस्टाइल आणि लिस्टिकल स्टोरीज अशा विविध विषयांचे कव्हरेज केले आहेत. सध्या, दक्षता लाईफस्टाईल या सेक्शनमध्ये जीवनशैली, सामान्य कथा आणि आरोग्य विभाग हाताळत आहे. गेल्या 22 महिन्यांपासून दक्षता या विभागात काम करत आहे. तिच्या मोकळ्या वेळेत, तिला ब्लॉग लिहिणे, पुस्तके वाचणे आणि चित्रपट पाहणे आवडते. तिची निपुणता आणि मीडियाबद्दलची आवड तिला कोणत्याही संस्थेसाठी मनापासून काम करण्यास मदत करते."

...Read More