Petrol Diesel चे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात स्वस्त झाले की महाग?

petrol diesel price : पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel) नवीन दर जाहीर झाले आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची विक्री समान दराने होत आहे. 

Bollywood Life | Updated: Sep 6, 2022, 08:05 AM IST
Petrol Diesel चे आजचे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरात स्वस्त झाले की महाग?  title=

Petrol Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी आज (6 सप्टेंबर ) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या (petrol-diesel) किमती नरमल्या असतानाही 6 सप्टेंबर रोजी वाहनांच्या इंधनाचे दर स्थिर आहेत.

कच्चे तेल प्रति बॅरल सुमारे $100 आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय स्तरावर सध्या पेट्रोल आणि डिझेल महागणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलही स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की सध्या किमती स्थिर राहतील. (petrol diesel price today)

तेल विपणन कंपन्यांनी (oil marketing companies) मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. याचाच अर्थ पेट्रोल आणि डिझेलची विक्री समान दराने होत आहे. प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर (Prices stable) असल्याचा हा 108 वा दिवस आहे.

ही आहे नवीन दर यादी

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल – 96.72 प्रति लिटर, डिझेल – 89.62 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. त्याच वेळी, कोलकातामध्ये पेट्रोल- 106.03 रुपये आणि डिझेल- 92.76 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर 106.31 रुपये, 94.27 रुपये प्रति लिटर आहेत. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपयांच्या पातळीवर उपलब्ध आहे. त्याचवेळी डिझेल 79.74 रुपये दराने विकले जात आहे. श्रीगंगानगरमध्ये सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल आहे.

ब्रेट क्रूड आंतरराष्ट्रीय (Brent Crude International) स्तरावर 95.39 रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्याच वेळी, यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाची किंमत देखील प्रति बॅरल $ 89.03 वर होती. 

तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तपासण्यासाठी येथे क्लिक करा

शहराचे नाव पेट्रोल रु/लिट डिझेल रु/लि

मुंबई 106.31 94.27
आग्रा 96.35 89.52
लखनौ 96.57 89.76
पोर्ट ब्लेअर 84.1 79.74
डेहराडून 95.26 90.28
चेन्नई 102.63 94.24
बेंगळुरू 101.94 87.89
कोलकाता 106.03 92.76
दिल्ली 96.72 89.62
अहमदाबाद 96.42 92. 17
चंदीगड 96.2 ८४.२६
भोपाळ 108.65 93.9
धनबाद 99.99 94.78
फरीदाबाद 97.45 90.31
गंगटोक 102.50 89.70
गाझियाबाद 96.50 89.68
गोरखपूर 96.76 89.94
श्री गंगानगर 113.49 98.24
परभणी 109.45 95.85
जयपूर 108.48 93.72
रांची 99.84 94.65
पाटणा 107.24 94.04

तुमच्या शहराचे दर याप्रमाणे तपासा

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज SMS द्वारेही पाहू शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवू शकतात.