Gold Rates Today : सोन्याचा भाव ५० हजार रूपयांवर

जाणून घ्या आजचे दर   

Updated: Oct 26, 2020, 09:01 AM IST
Gold Rates Today : सोन्याचा भाव ५० हजार रूपयांवर

नवी दिल्ली : कोरोनाचं सावट फक्त देशावर नाही तर संपूर्ण जगावर आहे. त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. सर्वच देशांची अर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर देखील अस्थिर आहे. त्यामुळे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली.  गत वर्षाच्या तुलनेत सोने २५ टक्क्यांनी महागले. सोन्याच्या सतत होत असलेल्या चढ-उतारा मुळे ग्राहकांनी फक्त चौकशी करणे पसंत केले.

गत वर्षीच्या तुलनेत यंच्या वर्षी सोने विक्रीत ५० ते ६० टक्के घसरण झाल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. २०१९ मध्ये सोन्याचे दर दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रती १० ग्रॅम ३८ हजारांच्या आसपास होते. तर या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर ५६ हजार २०० रूपयांवर पोहोचला आहे. रविवारी सोन्याचे भाव ५१ हजार रूपयांच्या घरात पोहोचला. 

दरम्यान, युरोपमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा पसरल्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता  सोने, क्रूड आणि बेस मेटलचे दर आणखी घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. 

goodreturns या वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ सोन्याचा भाव ५० हजार ५० रूपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे  दर ५१ हजार ५० रूपये आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ४९ हजार ४०० रूपये असून २४ कॅरेट सोन्याचे दर ५२ हजार ८९० रूपये आहे. 

त्याचप्रमाणे कोलकाता  आणि चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे ५० हजार ५१० रूपये आणि ४७ हजार २२० रूपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे  दर ५१ हजार ७१० रूपये आणि ५१ हजार ५१० रूपये आहे.