काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय असे खालच्या बाजूने उघडे का असतात? जाणून घ्या कारण

तर आज आम्ही तुम्हाला यामागचं लॉजिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील याची माहिती मिळेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना याबद्दल सांगू शकाल.

Updated: Apr 18, 2022, 03:59 PM IST
काही ठिकाणचे सार्वजनिक शौचालय असे खालच्या बाजूने उघडे का असतात? जाणून घ्या कारण title=

मुंबई : काही टॉयलेचचे दरवाजे हे पूर्णपणे बंद असतात. परंतु बऱ्याच ठिकाणी अर्ध उघडं टॉयलेट देखील पाहायला मिळतात. या टॉयलेटचा जमिनीपासूनचा काही भाग हा उघडा असतो. अशाप्रकारचे टॉयलेट्स आपल्याला बऱ्याच मॉल किंवा ऑफिसमध्ये पाहायला मिळतात. परंतु असं का केलं जातं? टॉयलेट अशी अर्धवट का ठेवली जातात? असा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय?

तर आज आम्ही तुम्हाला यामागचं लॉजिक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला देखील याची माहिती मिळेल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना याबद्दल सांगू शकाल.

खरे तर अशी अर्धवट टॉयलेट उघडं ठेवण्यामागे अनेक कारणं आहेत आणि त्याचे अनेक फायदेही आहेत. उदाहरणार्थ, याचे दरवाजे लहान असल्यास शौचालय सहज साफ करता येते. जमिनीवर असलेले पाणी आणि ओलावा यामुळे दरवाजे खराब होण्याचा धोका नाही. याशिवाय, अशी अनेक कारणे आहेत जी आश्चर्यकारक आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घ्या.

अशा दरवाजांमुळे टॉयलेटमध्ये हवेचा संचार चालू राहतो. ज्यामुळे गुदमरल्यासारखी परिस्थिती राहात नाही.

तसेच टॉयलेटमधील व्यक्तीला आपत्कालीन आरोग्य समस्या उद्भवल्यास त्याला सहज मदत करता येते. याउलट जर दरवाजे पूर्णपणे बंद असतील, तर कोणालाही मदत करणे सोपे नाही.

टॉयलेटमध्ये बहुतेक लोक धूम्रपान करतात. ज्यामुळे पूर्णपणे बंद असलेल्या शौचालयात धूर भरल्याने आरोग्याला अधिक नुकसान होते. त्याच वेळी, दरवाजे खालून खुल्ले असल्याने आरोग्याचा धोका कमी होतो. यामुळे सिगारेटचा धूर सहज बाहेर पडतो आणि वेंटिलेशन चांगले राहाते.

याशिवाय टॉयलेटमध्ये येणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला देखील सजज कळते की, बाजूची व्यक्ती धुम्रपान करत आहे. ज्यामुळे अशा गोष्टींना आळा घालणं देखील सोपं होतं.

अनेक वेळा लहान मुले शौचालयात अडकून बसतात, अशा अनेक घटना समोर आल्या आहे, अशावेळी दरवाजे तोडण्याची वेळ येते. नवीन टॉयलेटमध्ये याचा कोणताही धोका नाही, कारण लहान मुलांना खालून किंवा वरच्या बाजूने बाहेर काढता येते.

अशा प्रकारे, असे दरवाजे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरतात. ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा दरवाज्यांचा वापरत केला जातो.