जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दहशतवादी शाम सोफी Encounter मध्ये ठार, सुरक्षा दलाला मोठं यश

जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी कमांडर शाम सोफी ठार झाला आहे. 

Updated: Oct 13, 2021, 04:46 PM IST
जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दहशतवादी शाम सोफी Encounter मध्ये ठार, सुरक्षा दलाला मोठं यश title=

नवी दिल्ली : जम्मू -काश्मीरमध्ये, सुरक्षा दलांना बुधवारी एका मोठ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात मोठे यश मिळाले. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्रालमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैशचा कमांडर दहशतवादी शाम सोफीला ठार केले. याला आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी दुजोरा दिला आहे.

जम्मू -काश्मीरमधील अवंतीपोराच्या त्राल भागातील तिलवानी मोहल्लामध्ये ही चकमक झाली. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार म्हणाले, जैशचा प्रमुख कमांडर दहशतवादी शाम सोफी त्राल या चकमकीत ठार झाला आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराच्या त्राल भागातील तिलवानी मोहल्ला वगगडमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तेथे घेराव घातला आणि शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले आणि चकमक सुरू झाली. यादरम्यान जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी कमांडर शाम सोफी ठार झाला आहे. आता शोधमोहीम सुरू आहे.