Tata Motors च्या शेअरची 20% नी उसळी; Rakesh Jhunjhunwala यांनी एका झटक्यात कमावले 300 कोटी

 टाटा ग्रुपच्या टाटा मोटार्सच्या शेअर्समध्ये आज शानदार तेजी दिसून आली. 

Updated: Oct 13, 2021, 04:19 PM IST
Tata Motors च्या शेअरची 20% नी उसळी; Rakesh Jhunjhunwala यांनी एका झटक्यात कमावले 300 कोटी

मुंबई : टाटा ग्रुपच्या टाटा मोटार्सच्या शेअर्समध्ये आज शानदार तेजी दिसून आली. आजच्या व्यवसायात टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची तेजी दिसून आली. शेअरने 519 रुपयांचा उच्चांकी आकडा गाठला होता. मंगळवारी हा शेअर 421 रुपयांवर बंद झाला होता. या तेजीमध्ये मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी जबरजस्त नफा कमावला आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेल्या टाटा मोटार्सच्या शेअरची वॅल्यू साधारण 300 कोटींनी वाढली आहे. अन्य रिटेल गुंतवणूकदारांचीही टाटा मोटार्सच्या शेअरने चांदी केली आहे.

टाटा ग्रुपचा हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्बीबॅगर ठरला आहे. हा शेअर एका वर्षात 270 टक्के वाढला आहे. दरम्यान शेअरची किंमत 134 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत पोहचली आहे. राकेश झुनझुनवाला यांची टाटा मोटार्सच्या शेअर्समध्ये 1.1 टक्क्यांची हस्सेदारी आहे. आज शेअरमध्ये तब्बल 80 रुपयांनी म्हणजेच 20 टक्क्यांनी तेजी नोंदवली गेली.
 
 तेजीचे कारण
 टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात TPG RISE CLIMATE तर्फे साधारण 7500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. ही डील 910 कोटी डॉलरच्या वॅल्युएशनवर झाली. ब्रोकरेज हाऊसेसचे म्हणणे आहे की, यामुळे कंपनीच्या व्यवसायाला आणखी बुस्ट मिळेल. 
 
 टाटा मोटर्समध्ये ब्रोकरेज हाऊस नोमुराने खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 547 रुपयांचे लक्ष निश्चित केले आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीजने शेअर्ससाठी आपले टार्गेट 565 रुपये ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊस HSBC ने टाटाच्या शेअर्ससाठी 550 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे.