close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाण्याची पातळी वाढल्याने ट्रॅक्टर अडकला, पुढे काय झालं? पाहा व्हिडीओ

 पुल निर्माण करणाऱ्या कामगारांनी खूप मेहनत घेऊन चालकाला वाचवले. 

Updated: Jul 12, 2019, 12:47 PM IST
पाण्याची पातळी वाढल्याने ट्रॅक्टर अडकला, पुढे काय झालं? पाहा व्हिडीओ

गिरिडीह : सलग होणाऱ्या पावसामुळे झारखंडच्या अनेक भागात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. गिरिडीहच्या उसरी नदीच्या पाण्याचा स्तरही इतका वाढला की पुलं बनवायच्या कामासाठी उभा असलेल एक ट्रॅक्टर त्यात बुडाला पण सुदैवाने चालक बचावला. पुल निर्माणाच्या कामासाठी उभा असलेला ट्रॅक्टर उसरी नदीच्या प्रवाहात अडकला. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी चालकाला अनेक तास लागले आणि त्यात तो स्वत:च अडकत गेला. पुल निर्माण करणाऱ्या कामगारांनी खूप मेहनत घेऊन चालकाला वाचवले. 

रस्ता निर्माण करण्यासाठी सिन्हा कन्स्ट्रक्शन उसरी नदीवर पुल निर्माणाचे काम सुरु होते. सलग येणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.

यामध्ये ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर अडकत गेली. जवळ काम करत असलेल्या कामगारांनी मोठ्या मेहनतीने ट्रॅक्टर बाहेर काढला आणि चालकालाही वाचवले. सध्या झारखंडमध्ये जोरात पाऊस सुरु आहे. सलग पावसामुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.