अॅम्ब्युलन्ससाठी या पोलिसाने रोखला राष्ट्रपतींचा ताफा...

 बंगळुरूच्या ट्रिनीटी सर्कलवर शनिवारी ड्युटीवर असलेल्या एका ट्रॅफीक पोलिसाने अशी कामगिरी केली, जी आपण फक्त चित्रपटात होईल असा विचार करू शकतो. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 20, 2017, 07:57 PM IST
  अॅम्ब्युलन्ससाठी या पोलिसाने रोखला राष्ट्रपतींचा ताफा... title=

नवी दिल्ली :  बंगळुरूच्या ट्रिनीटी सर्कलवर शनिवारी ड्युटीवर असलेल्या एका ट्रॅफीक पोलिसाने अशी कामगिरी केली, जी आपण फक्त चित्रपटात होईल असा विचार करू शकतो. 

एखाद्या व्हीआयपीचा ताफा रस्त्यावरून जात असेल तर सामन्यांना त्याचा त्रास होतो. पण शनिवारी ट्रिनीटी सर्कलवर वेगळचं चित्र पाहायला मिळालं.

सब इन्पेक्टर एम. एल. निजलिंगप्पा यांनी राष्ट्रपती यांच्या ताफ्याची मुव्हमेंट होणार असल्याचे कळाले असताना एका अॅम्ब्युलन्सला रस्त्यावरून प्रथम जाऊ दिले. ती रस्त्यावरून गेल्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा गेला. 

 

राजभवनाकडे जात होता राष्ट्रपतींचा ताफा 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शहरातील मेट्रोच्या ग्रीन लाइनचे उद्घाटन करण्यासाठी आले होते.  त्यामुळे राष्ट्रपतींचा ताफा राजभवनकडे जात होता, तेव्हा एका अॅम्ब्युलन्सला ट्रॅफिकमध्ये फसलेले पाहिले तेव्हा एम.एल. निजलिंगप्पा यांनी ट्रॅफीकला जागा करून दिली. 

 

बंगळुरू पोलीस करणार सन्मान 

निजलिंगप्पा यांच्या या कारनाम्याची प्रशंसा होत आहे. सोशल मीडियावर निजलिंगप्पा यांचे कौतुक होत आहे. बंगळुरू पोलीसांनी निजलिंगप्पा पुरस्काराची घोषणा केली आहे.