नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
तसेच, २०१९ च्या निवडणूकीत ५४० जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सर्वांना १०० टक्के प्रयत्न करावाच लागणार असल्याच्या सूचनाही अमित शाह यांनी मुंबईच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
- शिवसेना आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे
- लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवायची आहे
- २०१९ निवडणूकीच्या कामाला लागा
- ५४० हे भाजपचं लक्ष्य असेल
- सर्वांनी १०० टक्के योगदान द्यायचं
- अमित शाह यांनी महाराष्ट्रीतल मंत्र्यांना दिला आदेश
- मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, पेज प्रमुखांची जबाबदारी निश्चित केली
- खासदार, आमदारांनी लोकांपर्यंत पोहोचायला पाहीजे
- पेज प्रमुखांनी पेजवरील मतदारांची जबाबदारी घ्यावी
- हे सर्व मतदार भाजपला मतदान टाकण्याची जबाबदारी पेज प्रमुखाची
- १ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा बैठक घेणार
- तीन दिवस आढावा बैठक असेल
- पेज प्रमुखांचा मेळावा घेतला जाईल
- मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, पेज प्रमुखांनी बैठकीत रिपोर्ट सादर करायचा
- खासदारांच्या कामावरूनच २०१९ चे तिकीट वाटप होणार - अमित शाह यांचा आदेश