Nitin Gadkari News : ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होतं आहे. त्यामुळे तो दिवस दुरु नाही की चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील अस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. ते नागपूरात फॉरचून फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.
शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोचा ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनचा क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
तसेच नागपूरात मिहानमध्ये 31 मार्चला इन्फोसिसच उदघाटन करणार असून त्यातून 5 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. मिहानच्या माध्यमातून 87 हजार जणांना रोजगार मिळाला असून पुढील निवडणुकीला समोर जाण्यापुर्वी 1 लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल असं संकल्प असल्याचा केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी बोलतांना म्हणालेत.
मिहानमध्ये 30 मार्चला इन्फोसिसचं उद्घाटन करणार आहे त्यामधून 5000 तरुणांना रोजगार मिळणार आहे टीसीएसने यापूर्वी 7000 तरुणांना मिहान मध्ये रोजगार दिलेला आहे त्यात पुढे वाढवून 30 हजार जणांना जॉब मिळणार आहे. एचसीएलमध्ये 60 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. ज्ञान मध्ये आतापर्यंत 87 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे पुढील निवडणुकीला समोर जाण्यापूर्वी एक लाख जणांना रोजगार मिळेल असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवलं. मेट्रोमुळे 13,323 लोकांना रोजगार दिला आहे.एमआयडीसी बुट्टीबोरीत 11 हजार 70 लोकांना रोजगार मिळाला आहे. उद्योग, टुरिझम सेक्टर आले तर रोजगार मिळेल आणि गरिबी सुरू होऊन समृद्धी मिळेल.
ड्रोनमध्ये मोठ्या प्रमाणात काम होत आहे. पहाडावर लागणारे सफरचंद खाली आणण्यासाठी त्रास होता. पण दोनशे किलोच्या ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणण्यात यशस्वी झालं आणि फायदा झाला. तो दिवस दूर नाही की चार माणसं ड्रोनमध्ये बसतील आणि विमानतळावर जातील. त्यामुळे आपण रोजगार उपलब्ध होऊ शकतो का यासाठी प्रयोग केले पाहिजे.
वर्षभरात अनेक उपक्रम सुरू केले, त्याचा टर्नओव्हर अडीच हजार कोटी रुपये झाला असूनपंधरा हजार पेक्षा जास्त जणांना रोजगार मिळाला आहे. प्लास्टिक गोळा करून त्यातून क्रूड पेट्रोल काढायचं मशिनरी आली आहे. ते क्रूड डिझेलमध्ये मिक्स करायचं त्यातून बस आणि ट्रक चालू शकते.
तांदळाच्या भुशीपासून बायो बीटूमीन म्हणजे डांबर तयार होईल. भारतात दरवर्षी तीस लाख टन डांबर आयात होतो. तो जर हे डांबर शेतकऱ्याच्या धानापासून तयार झाल्यास शेतकऱ्यांपासून सगळे मी विकत घ्यायला तयार आहे असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. अहमदाबाद ते ढोलारा २० हजार कोटीचा रस्ता बांधणार असून त्यामध्ये वीस लाख टन कार्पोरेशनचा कचरा रस्ता निर्माण टाकणार आहे असल्याचंही केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.