Trending News : हैदराबादमध्ये वाईएसआर तेलंगना पार्टीच्या (YSRTP) प्रमुख वाई. एस. शर्मिला यांना पोलिसांनी कारसकट उचललं. 28 नोव्हेंबरला हैदराबादमधल्या वारंगल इथं पदयात्रेदौरान विरोध प्रदर्शन करण्यात आलं होतं. याविरोधात शर्मिला यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलनाचं आव्हान केलं होतं. वाई एस शर्मिला आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगन मोहमन रेड्डी यांच्या बहिण आहेत. वाईएसआर तेलंगना पार्टीच्या विरोध प्रदर्शनादरम्यान, सत्तारुढ तेलंगना राष्ट्र समितीने हल्ला केला होता.
याचा निषेध करण्यासाठी वाई एस शर्मिला यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचं आव्हान केलं होतं. यासाठी त्या स्वत: कार चालवत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आल्या. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पोलिसांनी वाई एस शर्मिला यांना थांबण्याची विनंती केली तसंच कारमधून बाहेर उतरण्यास सांगितलं. पण पोलिसांची विनंती शर्मिला यांनी धुडकावून लावली. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत शर्मिला यांना त्यांच्या कारसह टो करत बाहेर नेलं.
मुख्यमंत्री निवासस्थानाला घेरण्याचा इरादा
वाई एस शर्मिला यांनी आपल्या समर्थकांना मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या प्रगति भवन इथं जमा होण्याचं आवाहन केलं होतं. त्यानुसार कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली, यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. याचवेळी शर्मिला यांची कारही पोलिसांनी टो करत तब्बल 4 किमी दूरवर असलेल्या एसआर नगर पोलीस स्थानकापर्यंत आणली.
#WATCH | Hyderabad: Police drags away the car of YSRTP Chief Sharmila Reddy with the help of a crane, even as she sits inside it for protesting against the Telangana CM KCR pic.twitter.com/ojWVPmUciW
— ANI (@ANI) November 29, 2022
हे ही वाचा : सीमावाद प्रश्न अचानक कसा उफाळून आला? राज ठाकरे यांचा सवाल
वाई एस शर्मिला यांचा घणाघात
शर्मिला यांनी आपल्या पदयात्रेत स्थानिक आमदार पी सुदर्शन रेड्डी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आमदाराच्या कमाईचं स्त्रोत काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.