गल्लीतल्या दूधवाल्याचा डर्टी पिक्चर; मुलींचे अश्लील फोटो काढून करत होता ब्लॅकमेल

उत्तर प्रदेशातील जोनपूर परिसरात गल्लीत येणाऱ्या दूधवाल्याने 6 ते 7 महिला आणि तरुणींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. 

Updated: Sep 30, 2021, 05:11 PM IST
गल्लीतल्या दूधवाल्याचा डर्टी पिक्चर; मुलींचे अश्लील फोटो काढून करत होता ब्लॅकमेल title=

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जोनपूर परिसरात गल्लीत येणाऱ्या दूधवाल्याने 6 ते 7 महिला आणि तरुणींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केल्याची घटना घडली आहे. या दूधवाल्याच्या जाचाला कंटाळून पीडित महिलांनी  पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दूधवाल्याच्या फोनमध्ये 7-8 महिला/तरुणींचे अश्लील फोटो
जोनपूरच्या जलालपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील भडेहरी गावातील अवनित यादव तरुणाने महिला आणि तरुणींचे अश्लील फोटो काढले. संबधीत तरुण गल्लीत नेहमी दूध विक्री करण्यास येत असल्याची माहिती मिळाली आहे. या फोटोंच्या आधारे तरुण या महिलांना ब्लॅकमेल करीत असे. 

आरोपीला सार्वजनिक मार
पीडितांपैकी एका तरुणीने हिम्मत करून आपल्या नातेवाईकांना यासंबधी माहिती दिली. नातेवाईकांनी अवनितला पकडून त्याचा मोबाईल चेक केला. त्यात त्या क्षेत्रातील अन्य महिलांचेही फोटो होते.

संतापलेल्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांनी आरोपीला मारहान केली नंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.