हा भन्नाट जुगाड एकदा पाहाच, यानं धक्का न मारता अशी गाडी खड्याबाहेर काढली, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा जुगाडाचा व्हिडीओ एकदा तुम्ही पाहाच.

Updated: Nov 1, 2021, 08:18 PM IST
हा भन्नाट जुगाड एकदा पाहाच, यानं धक्का न मारता अशी गाडी खड्याबाहेर काढली, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : अनेकदा एखादे वाहन चिखलात अडकले की, लोकं त्याला धक्का मारुन किंवा एखाद्या दुसऱ्या वाहनाच्या मदतीने बाहेर काढतात. ज्यासाठी खूप मेहनत देखील करावी लागते, तसेच वेळ देखील वाया जातो. त्यात कधी कधी आपण वाहन बाहेर काढायला ट्रॅक्टरचा देखील वापर करतो, कारण तो सगळ्या वाहनांमध्ये शक्तिशाली असतो. परंतु समजा जर ट्रॅक्टरच अडकला तर? तर त्याला कसं बाहेर काढणार? यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे.

सोशल मीडिया एक असं माध्यम आहे, जेथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ किंवा कंटेन्ट पाहायला मिळतात, जे तुमचं मनोरंजन देखील करतात. सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होणारा हा जुगाडाचा व्हिडीओ एकदा तुम्ही पाहाच.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक ट्रॅक्टर मातीच्या खड्ड्यात अडकला आहे, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने त्याला बाहेर काढण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सर्वप्रथम त्या माणसाने एक मजबूत लाकडी काठी मागच्या टायरच्या थोडी पुढे ठेवली आणि नंतर ट्रॅक्टरची ट्रॉली खाली करायला सांगितली, त्यामुळे मागचे चाक हवेत उंचावले आणि नंतर ट्रॅक्टर पुढे सरकवला, अशाप्रकारे त्याला धक्का न लावता. ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला.

जुगाडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांनी खूप पसंत केला जात आहे. या माणसाच्या जुगाडाचे अनेकांनी कौतुक केले. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'हे जुगाड खरोखरच कौतुकास्पद आहे.' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'हे छोटे देसी जुगाड खूप कामाचे आहेत.' याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी  या युक्तीची प्रशंसा केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही सेकंदांचा हा व्हिडीओ jugaadu_life_hacks नावाच्या अकाऊंटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बातमी लिहिपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.