Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण रिल्स (Reels) बनवत असतात. पण प्रसिद्धीच्या नादात काही जण नको त्या गोष्टी करुन बसतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटिझन्सने (netizens) संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी एका महिलेने आपल्या मुलाबरोबर रोमँटिक डान्स (romantic dance) केला आणि ते व्हिडिओ व्हायरल केले. या महिलेने विविध गाण्यांवर आपल्या मुलाबरोबर डान्स करत ते व्हिडिओ व्हायरल केले आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्या महिलेला अटक करण्याची मागणी केली आहे.
इन्स्टाग्रामवर 1 लाख 30 हजार फॉलोअर्स
एका इन्स्टा अकाऊंटलर या महिलेने व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओत दिसणारी महिला ही त्या मुलाची सावत्र असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संतापलेल्या नेटीझन्सने त्या महिलेच्या अटकेची मागणी करत महिला आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ट्विटरवर या महिलेचा आणि मुलाचा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने लिहिलंय, हे दोघं आई-मुलगा आहेत आणि हे खुपच विचित्र आहे. एका युजर्सने त्यांचे अनेक व्हिडिओज शेअर करत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमध्ये ती महिला आणि मुलगा विविध रोमँटिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मुलगा त्या महिलेला मिठी मारताना आणि किस करतानाही दिसत आहे.
हे सर्व व्हिडिओज Rachna नावाच्या प्रोफाईवरुन इन्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. व्हिडिओत रचना स्वत:ला आई आणि व्हिडिओत दिसणाऱ्या मुलाला स्वत:चा मुलगा असल्याचं सांगतेय. इन्स्टाग्रामवर (Instagram) त्यांचे जवळपास 1 लाख 30 हजार फॉलोअर्स आहेत.
एका युजर्स महिलेने हे व्हिडिओ महिला आयोगला (Commission for Women) टॅग केले आहेत. शिवाय तीने या प्रकारच्या तपासाची मागणीही केली आहे. तिचं म्हणण्यानुसार या मुलाकडून जबरदस्तीने व्हिडिओ बनवले जात असावेत. मुलाच्या मानसिक आरोग्यावर याचा प्रभाव पडू शकतो असं या युजर्सचं म्हणणं आहे.
These two are mom and son I don't know what the lyrics are saying but this is weird pic.twitter.com/4430ms94IM
— Sensei Kraken Zero (@YearOfTheKraken) September 18, 2022
तरुण वयातच मुलाला महिलांसह अश्लील कृत्य करणं आणि त्यासाठी प्रोत्साहित करण्यास शिकवलं जात आहे. शिवाय आई-मुलाचं पवित्र नातंही कलंकित होत आहे. असा मुलगा भविष्यात महिला आणि मुलींबद्दल काय विचार करेल? जर हे असंच सुरु राहिले तर पुढे जाऊन या मुलामध्ये गुन्हेगारी मानसिकता उद्भवू शकते असं एका महिलेने कमेंट केली आहे.