Doctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!

Doctor Fight Video : सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

Updated: Jan 31, 2023, 04:45 PM IST
Doctors Fight Video: सर्जरी सुरू असतानाच दोन डॉक्टर भिडले, ऑपरेशन थेटरमधील फुटेज व्हायरल!
Doctor Fight Video

Doctors Fight In Opration Theatre Video Viral : सर्वसामान्य लोकांसाठी डॉक्टर (Doctors) म्हणजे देवाचं रूप असतं. सर्वात मुल्यवान गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य. आजारी पडल्यावर किंवा शारिरीक व्याधी उत्पन्न झाल्यावर डॉक्टर्स आपल्यासाठी सर्वकाही असतात. मात्र, डॉक्टरांचा निष्काळजीपणा (Doctor's negligence) एखाद्याच्या जीवावर उठू शकतो. अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्याचबरोबर तुम्हीही रागाने लालबुंद झाल्याशिवाय राहणार नाही. (Trending Video Doctors Fight Inside Operation Theatre in Jodhpur Video goes viral again Caught On Camera)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये (Doctor Fighting Caught On Camera) सर्वकाही कैद झालंय. ऑपरेशन थिएटरमध्ये काही डॉक्टर एकत्र रुग्णावर शस्त्रक्रिया (Surgery) करत असतात. अचानक दोन डॉक्टरांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण (Doctor Fight Video) झालं. सुरूवातीला दोघांनी आवरतं घेण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर वाद आणखी पेटू लागला.

आणखी वाचा - प्रिया प्रकाश वारियरचा किसिंग व्हिडिओ लीक; चाहत्यांना मोठा धक्का

दोघेही एकमेकांशी भांडतात आणि वाद घालू लागतात. त्याचवेळी ऑपरेशन थेटरमध्ये उपस्थित असलेल्या कोणा एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्याने ऑपरेशन (Mobile Camera) थिएटरच्या आतील सर्व गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा भांडाफोड झालाय.

पाहा Video - 

दरम्यान, हा व्हिडीओ 2017 मधील असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर डॉक्टरांना निलंबित देखील करण्यात आलं होतं. मात्र, सध्या हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Trending Video) होताना दिसतोय. हा व्हिडिओ (Doctor Fight Video) पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. डॉक्टरांचा हा प्रतापामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो, असं नेटकऱ्यांनी म्हणटलं आहे.