Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...

Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. 

Updated: Mar 29, 2023, 10:17 AM IST
Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग... title=
trending Video husband was doing third marriage first wife enters high voltage drama Video Viral on Social media

Husband Wife Wedding Viral Video : लग्न हे आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. नव्या आयुष्याची सुरुवात प्रेम आणि विश्वासाने केली जाते. नवं जोडप्यासाठी हा क्षण खूप अनमोल असतो. प्रत्येक नात्याचा पाया असतो म्हणजे विश्वास...पण जर लग्नाची सुरुवातच एका खोट्या गोष्टीने असेल तर...चित्रपटात आपण अनेक वेळा पाहिलं आहे. पहिली बायको असताना नवरा दुसरं लग्न करतो आणि हे धक्कादायक कृत्य जेव्हा पहिला बायकोला कळतं तेव्हा काय होतं...

सध्या सोशल मीडियावर असाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक महिला खूप गोंधळ घालताना दिसतं आहे. झालं असं की, लग्नासाठी पाहुणे मंडळी जमली आहे. लग्न मंडप नवरदेव नवरीसाठी सजलं आहे. सात जन्माचा शपथ घेत असताना तिथे एक महिला आली अन् मग...

अहो ही महिला त्या नवरदेवाची पहिली बायको असल्याचं तिने म्हटलं आणि लग्नात एकच गोंधळ झाला. नवरदेव माझा नवरा असून माझ्या मुलांचा बाप आहे...एवढंच नाही तर त्याला अजून एक पत्नी आहे असाही दावा ती महिला करते. त्यानंतर लग्नमंडपातील पाहुणे बुचकळ्यात पडतात. 

तो नवरदेव गुपचूप दुसरं नाही तर तिसरं लग्न करत असताना बायको लग्नात एन्ट्री घेते आण हाय व्होलटेज ड्रामा घडतो. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

माझा नवरा हैद्रराबादला जातो असं म्हणून इथे लग्न करण्यासाठी आला आहे. त्याची दुसरी बायको आजारी असल्याने आली नाही. हे सगळं ऐकून काही जण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण ती कोणाचं ऐकतं नव्हती. काही लोक तिला एका खोलीत घेऊन जातानाही या  व्हिडीओमध्ये दिसत आहेत. 

हा व्हिडीओ ट्वीटरवर Ghar Ke Kalesh या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओला तुफान व्ह्यूज मिळाले आहेत.  महिलेच्या दावानंतर लग्न मंडपातील पाहुणे थक्क झाले.

 ती म्हणाली की 10 ऑक्टोबर 2014 ला त्या नवरदेवाने तिच्याशी लग्न केल्याचा दावा तिने केला आहे. या व्हिडीओमध्ये काही वेळाने नवरदेव बटण उघडे असलेला शर्ट आणि पिवळ्या लुंगीमध्ये दिसतो. असं वाटतं आहे की, त्याला आणि वधूच्या कुटुंबाने फसवणूक केल्याबद्दल जोरदार मारहाण केली आहे.