Video Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?

Viral Video : सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे, सकारात्मक व्हिडीओही मोठ्या प्रमाणात पाहिला मिळतात. असाच एका कलियुगातील श्रावणबाळाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.

Updated: Apr 21, 2023, 08:53 AM IST
 Video Viral : कलियुगातील 'श्रावण बाळ'! नेटकऱ्यांचं मन जिंकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का? title=
trending video kalyug ka shravan little boy helps parents ride cycle on flyover Video Viral Social media trend now

Little Boy Helps Parents Viral Video : खांद्यावर कावड घेऊन आई वडिलांना देवदर्शनला घेऊन जाणाऱ्या श्रावण बाळाची गोष्ट आपण सर्वांनाच माहिती आहे. सोशल मीडियावर अशाच एका श्रावण बाळाने नेटकऱ्यांचं मनं जिंकल आहे. या चिमुकल्याने जे काही केलं त्यानंतर कलियुगातील या श्रावण चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर मनं प्रसन्न करणारे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. 

एकीकडे जेथे आपण पोटच्या पोरांनीच आई वडिलांच्या घात केला. अशा बातम्या वाचतो किंवा बघतो. तेव्हा आजकालची पोरं असा सहज आपण बोलून जातो. पण दुसरीकडे जेव्हा अशी आई वडिलांच्या आनंदासाठी मुलं काही तरी करताना दिसतात तेव्हा एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते. (trending video kalyug ka shravan little boy helps parents ride cycle on flyover Video Viral Social media trend now)

 कलियुगातील 'श्रावण बाळ'!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका सायकलवर आई वडील बसले (Son Helping Mom-Dad Video) आहेत. पुलावरुन जाताना वडिलांना सायकल चढवणे कठीण जातं आहे. अशावेळी तो चिमुकला सायकला मागून धक्का देताना दिसतं आहे. त्याच वेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका प्रवाशाने हे दृश्यं कॅमेऱ्यात कैद केलं. 

निरागस आणि तेवढ्याच गोंडस या मुलाने क्षणात नेटकऱ्यांच्या हृदयात घरं केलं आहे. आजच्या युगात अशी मुलं मिळणं कठीण आहे, असंच अनेकांना वाटतं. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. चिमुकल्याची आई वडिलांसाठीची ही भावना पाहून नेटकऱ्यांची मनं त्याने जिंकली आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर  IAS अवनीश सरन यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी लिहिलं आहे की, ''आयुष्यभर असाच पालकांना आधार हो.''

किती खरं आहे ना हे वाक्य...जे आई वडील आपल्या भविष्यासाठी दिवसरात्र काम करतात. त्यांना मुलांनी असा छोट्या छोट्या गोष्टीत पण अशी मदत केली तर आई वडिलांना त्यांचं जीवन सार्थक झालं असेच वाटतं. 

या 10 वर्षीय चिमुकल्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होतं आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो यूजर्सने पाहिला आहे.