Smoking in Train : धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral

Viral Video Smoking in Train :  सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा गुन्हा आहे. तरीदेखील त्या व्यक्तीने चक्क रेल्वेमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत सिगरेटचा कश घेतल्या. या व्यक्तीचं कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग...

Updated: Feb 6, 2023, 11:24 AM IST
Smoking in Train :  धावत्या ट्रेनमध्ये सिगरेटचा कश! सहप्रवाशांसोबतही गैरवर्तन, एका ट्वीटनंतर व्यक्तीला...; Video Viral  title=
trending Video passangers smoking inside moving train and Misbehavior with passengers Video Social Media Twitter Viral Action by Indian Railways

Social Media Viral Post : एक्स्प्रेस ट्रेनमध्ये लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर धूम्रपान करत (Smoking in Train) असताना एका व्हिडीओचा व्हिडीओ (Viral Video) इंटरनेटवर तुफान व्हायरल (trending Video) होतं आहे. सार्वजिनक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. त्यात या व्यक्ती चक्क रेल्वेमध्ये धूम्रपान करुन सहप्रवाशांना त्रास दिला. इतकंच नाही नाही तर इतर प्रवाशांना शिवीगाळ (Misbehavior with passengers) केली. त्याचं हे कृत्य सहप्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद (Indian Railways Video) केलं. रेल्वेमध्ये खुलआम सिगरेटचा (cigarette) कश घेणे हे रेल्वे कायद्याच्या कलम 167 नुसार गुन्हा आहे. तरीदेखील या तरुणीची मुजोरी पाहून संतप्त प्रवाशांने रेल्वेला हा व्हिडीओ ट्वीट केला. (Indian Railways news)

रेल्वेकडे कारवाईची मागणी

डब्यातील एका प्रवाशाने हा व्हिडीओ ट्विटरवर (Twitter Post) शेअर केला. मनीष जैन (Manish Jain) असं त्या यूजर नाव आहे. त्याने रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत खात्याला इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत खात्यासह टॅग केलं. त्याने तक्रार केली की, ''प्रवासी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांसमोर सिगरेट (smoking Train) घेत आहे आणि सर्वजण त्याला थांबवत असताना त्याने शिवीगाळ केली. ट्रेन क्रमांक 14322 कोच S-5 सीट क्रमांक 39-40. कृपया लवकरात लवकर कारवाई करा.'' (trending Video passangers smoking inside moving train and Misbehavior with passengers Video Social Media Twitter Viral Action by Indian Railways)

रेल्वेने ट्विटरवची घेतली दखल

रेल्वेने त्यांच्या ट्वीटची दखल घेत त्वरित त्या ट्वीटला उत्तर दिलं. ते म्हणाले की,  ''सर, आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुमचा प्रवास तपशील (PNR/UTS नंबर) आणि मोबाइल नंबर आमच्यासोबत DM द्वारे शेअर करा. जलद निवारणासाठी तुम्ही थेट http://railmadad.indianrailways.gov.in वर तक्रार करू शकता किंवा 139 वर डायल करू शकता.''

रेल्वेने व्यक्तीचा उतरवला अहंकार

या ट्विटनंतर त्या सहप्रवाशांने सगळी माहिती दिली आणि काही मिनिटांनंतर आरपीएफ जवान बांदीकुई स्टेशनवर आला. त्या जवानाने त्या तरुणाला ट्रेनमध्ये सिगारेट ओढू नका असा इशारा दिला आणि चांगली समज दिली. 

थँक्यू इंडियन रेल्वे!

दरम्यान, ही घटना भुज-बरेली आला हजरत एक्स्प्रेस या ट्रेन क्रमांक 14322 च्या एस-5 डब्यात घडली आहे. या घटनेमुळे ट्विटर वापरकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडीओ पाहून ट्रेनमध्ये धूम्रपान करताना आढळलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ''अनेकांचे जीव आणि सार्वजनिक मालमत्ता धोक्यात आणल्याबद्दल या प्रवाशांना अटक केली पाहिजे.''  दुसऱ्याने प्रवाशांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण केल्याबद्दल भारतीय रेल्वेचे कौतुक केले. त्यांनी लिहिले, ''डिजिटल इंडियाची शक्ती. भारतीय रेल्वेचे आभार.''