Tiger Elephant Video Viral : वाघ आणि सिंहाचं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो. सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. वाघ आणि सिंह हे जंगली प्राण्याची शिकार करतात. जंगल अभ्यास तज्ज्ञ म्हणतात की, प्राण्यांना भूक लागली तरच ते शिकार करतात नाही तर इतर वेळी ते शांत असतात. वाघ आणि सिंह म्हटलं तर भीतीच वाटते. सध्या सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. (Trending Video Tiger Elephant Video Viral on Social media jim corbett park elephant herd tiger hide after seeing )
वाघ मोठ्या ऐटीत जंगलातून जात होता. तेवढ्यात त्याला हत्तींची गर्जना ऐकू आली. तो लगेचे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडप्यात लपला...वाघाने हत्तींना तिथून जाऊ दिले आणि झुडप्यातून शांतपणे पाहत होता.
तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता तीन बलाढ्य हत्ती जंगलातील पायवाटेवरुन जाताना दिसत आहे. एका मागोमाग तिन्ही हत्ती तिथून जातात. तरीही काही वेळ वाघ शांतपणे बसून असतो. आता त्याला वाटलं हत्तीचं कळप गेलं आहे. म्हणून तो उठतो ज्या दिशने हत्ती गेले तिथे जाऊन पाहतो ते नक्की गेले आहे की नाही...
पण वाघाला हत्तीचा आवाज येतो म्हणून तो इकडे तिकडे बघू लागतो. ज्या दिशेने पहिले हत्ती आले असतात तो तिथे झुडप्यात जाऊन पाहतो अन् अचानक समोर मोठा हत्ती येतो आणि वाघ तिथून पळ काढतो. हा मजेदार आणि अतिशय दुर्मिळ असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
This is how animals communicate & maintain harmony…
Elephant trumpets on smelling the tiger. The king gives way to the titan herd
Courtesy: Vijetha Simha pic.twitter.com/PvOcKLbIud— Susanta Nanda (@susantananda3) April 30, 2023
यूजर्सलाही हा व्हिडीओ खूप आठवडतोय. काही जणांना तर जंगल बुकची आठवण होते आहे. हा व्हिडीओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी Susanta Nanda यांनी त्यांचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अधिकृत्य अकाऊंटवर शेअर केला आहे.