धक्कादायक ! ट्रिपल मर्डर, एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या; मुलालाही सोडले नाही

Triple Murder : धक्कादायक घटना. ट्रिपल मर्डर करण्यात आल्याने फजलगंज भागात एकच खळबळ उडाली आहे.  

Updated: Oct 2, 2021, 01:05 PM IST
धक्कादायक ! ट्रिपल मर्डर, एकाच कुटुंबातील 3 जणांची हत्या; मुलालाही सोडले नाही title=

कानपूर : Triple Murder : धक्कादायक घटना. ट्रिपल मर्डर करण्यात आल्याने फजलगंज भागात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh) कानपूरच्या (Kanpur) फजलगंज भागात एका किराणा दुकानाच्या मालकाची पत्नी आणि मुलासह हत्याही करण्यात आली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीनंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

दरम्यान, या तिहेरी हत्यामागील कारण समजू शकलेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत. या हत्याप्रकरणी असे सांगितले जात आहे की, मुलाचे तोंड पॉलिथीनने बांधलेले होते. तर महिला आणि पुरुषाच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळून आल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर पोलिसांनी खूनाचा संशय व्यक्त केला आहे.

किराणा दुकानाच्या मालकाची हत्या केल्यानंतर मारेकरी दुचाकीवरुन पळून गेले. या मारेकऱ्यांनी गळा दाबून किंवा धारदार शस्त्राने हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. या हत्याकांडचा छडा उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.