देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis:  अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 31, 2024, 10:56 AM IST
देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या-येण्याचा खर्च मी करतो- उद्धव ठाकरे title=
Uddhav Thackeray on Devendra fadanvis

Uddhav Thackeray Political attacked on Devendra Fadanvis: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर सिनेमा पाहावा, त्यांच्यासाठी मी संपूर्ण थिएटर बुक करतो, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर आता उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय. देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर-लडाखमध्ये जावं, जाण्या येण्याचा खर्च मी करतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ विरोध पक्षनेते आज दिल्लीतील रामलिला मैदानात एकत्र येत आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत हे रामलीला येथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. 

केजरीवालांना अटक करणं म्हणजे हुकूमशाही

अरविंद केजरीवाल माझ्या घरी आले होते. देशात जी हुकूमशाही आली आहे त्या विरोधात एक होण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितल होते.हेमंत सोरेन, केजरीवालांना अटक करणं म्हणजे हुकूमशाही आली आहे. केसेस टाकून अटकेत टाकलं जाते. ही लोकशाही नाही, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. 

'अजित पवार, हसन मुश्रीफ ठग'

खरे ठग कोण आहेत हे लोकांसमोर येईल. खरे ठग भाजपचे नेते आहेत.अजित पवार, हसन मुश्रीफ ठग होते. राष्ट्रवादीत ठग उरले नाहीत, असे विधान संजय राऊतांनी यावेळी केले. गद्दारी करून मविआ सरकार पाडलं. त्यांच्याकडील ठगांच्या केसेस मागे घेतल्या जाताहेत. 

महाविकास आघाडीत दोन महिने बोलणी सुरु आहे. आम्ही पुढे जातोय, असे ठाकरे म्हणाले. देवेंद्र फडणवीसांचे जाण्या येण्याचा खर्च करतो. त्यांनी मणिपूर, लडाख, दार्जिलिंग, अरूणाचलमध्ये जावं…कश्मीरी पंडीतांना त्यांनी भेटावं. एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल्स हा चित्रपट काढावा असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 

अपक्ष उमेदवार देणार नाही, 'सगेसोयरे'ला विरोध करणाऱ्यांना पाडा- मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x