आधारकार्डात ऑनलाईन बदल करण्याची 'ही' सुविधा बंद

  अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

Updated: Nov 5, 2017, 12:29 PM IST
आधारकार्डात ऑनलाईन बदल करण्याची 'ही' सुविधा बंद  title=

 मुंबई :  अनेक सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे.

आधारकार्डामध्ये तुम्हांला नावतील चूक, पत्ता, मोबाईल क्रमांक इत्यादी गोष्टी अपडेट करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली होती. मात्र UIDAIने  आता यामध्ये बदल केला आहे. नव्या आदेशानुसार अर्ध्याहून अधिक डिटेल्स भरण्यासाठी तुम्हांला थेट एनरोलमेंट सेंटरवर  जावं लागेल. 
 
 UIDAI ने ऑनलाईनद्वारा अपाडेटची सुविधा सीमित केली आहे. आता ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही केवळ तुमचा पत्ता अपडेट करू शकाल. इतर अपडेट्ससाठी जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जाणं भाग आहे.  
 
 मोबाईल लिंकिंगही बंद  
 पूर्वी UIDAI च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नवा किंवा दुसरा मोबाईल क्रमांक अपडेट किंवा लिंक करू शकत होता. मात्र आता ही सोय बंद करण्यात आली आहे. नव्या मोबाईल क्रमांकाच्या अपडेटसाठी तुम्हांला एनरोलमेंट सेंटरवर जाऊन अर्ज दाखल करावा लागेल.