आणखी एका काकांचा डान्स व्हिडीओ व्हायरल

आणखी एका काकांचा व्हिडीओ व्हायरल

Updated: Jun 5, 2018, 05:57 PM IST
आणखी एका काकांचा डान्स व्हिडीओ व्हायरल title=

मुंबई : सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एका काकांचा डान्सिंग व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तुम्हाला हा व्हिडीओ पाहायला मिळाला असेल. प्रत्येकजण हा व्हिडीओ शेअर करत होता. त्या व्हिडीओत काकांनी गोविंदाच्या आप के आ जाने से या गाण्यावर खतरनाक डान्स केला होता. पण आता आणखी एका काकांचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. 

अरविंद गर्ग असं या काकांचं नाव आहे. ते 45 वर्षांचे आहेत. मुजफ्फरनगरमध्ये एका साखरपुड्यातला हा व्हिडिओ आहे. त्यांचा हा डान्स पाहून सगळेच हैराण झाले.

पाहा व्हिडिओ