मेहुण्याची हत्या करायला गेलेल्या पतीने पत्नीचीच केली हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, शेजारी पण जखमी

UP Crime : चार महिन्यांपूर्वी झालेल्या विवाहामुळे नाराज झालेल्या या जोडप्याने शुक्रवारी अलसुबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडला गावं गाठले होते. जमावाने घेराव घालताच आरोपीने हवेत गोळीबार सुरू केला. त्यानंतर त्याने पत्नीवर गोळी झाडून हत्या केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडली.

Updated: Jun 30, 2023, 02:00 PM IST
मेहुण्याची हत्या करायला गेलेल्या पतीने पत्नीचीच केली हत्या; स्वतःवरही झाडली गोळी, शेजारी पण जखमी title=
(फोटो सौजन्य - Reuters)

UP Crime : उत्तर प्रदेशच्या (UP News) मुजफ्फरनगरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःवरच गोळ्या झाड्यात स्वतःला संपवलं आहे. खळबळजनक बाब म्हणजे मृत पती हा त्याच्या मेव्हण्याची हत्या करण्यासाठी गेला होता. मात्र असं काही घडलं की त्यांने पत्नीची हत्या करत स्वतः आत्महत्या केली आहे. गोळीबाराच्या घटनेनं गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (UP Police) गावात धाव घेत तपास सुरु केला आहे.

शुक्रवारी मुझफ्फरनगरमध्ये रस्त्याच्या मधोमधच पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. चार महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. शुक्रवारी हा वाद इतका चिघळला की यातून दोघांचाही जीव गेला आहे. मृत पतीने पत्नीच्या छातीच गोळी मारल्याने ती रस्त्यावर व्हिवळत पडली होती. मात्र लोकांनी तिला मदत करण्याऐवजी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात धन्यता मानली. मात्र जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं तेव्हा तिचा मृत्यू झाला होता.

मृत पतीचे नाव नसीम असून पत्नीचे नाव तमन्ना आहे. नसीम हा मखियाली गावचा रहिवासी आहे. तर तमन्ना ही गाझियाबादच्या लोनी येथील रहिवासी होती. मात्र हा सगळा प्रकार लसुबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडला गावात घडला आहे. दोघांच्याही मृत्यूनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दुसरीकडे मध्यरात्री घडलेला घटनाक्रम ऐकून पोलिसांनी धक्का बसला आहे.

नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नसीम आणि तमन्नाचा विवाह नसीमचा चुलत भाऊ सद्दाम यानेच लावून दिला होता. मात्र विवाहानंतर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. गुरुवारीही दोघांमध्ये असाच वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या नसीमने सद्दामला फोन केला. आमच्या दोघांचा विवाह लावून तू चुकीचे काम केले आहे असे नसीमने सद्दामला सांगितले. त्यानंतर शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता नसीम पत्नी तमन्नाला बाईकवर घेऊन सद्दामच्या घरी पोहोचला. मात्र सद्दामने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर नसीमने आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नसीमचा गोंधळ ऐकून सद्दामचा शेजारी साबीर घराबाहेर आला. त्याने याबाबत नसीमला जाब विचारला. त्यावेळी संतापलेल्या नसीमने साबीरच्या दिशेने गोळी चालवली. गोळी साबीरच्या मानेजवळून गेली. मात्र साबीर यातून बचावला. त्यानंतर घटनास्थळी अनेकांची गर्दी जमली. 

गावातील जमाव पाहून नसीमने बाईकवर बसून तिथून निघण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही बाईकवरच त्याचे तमन्नासोबत जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात नसीमने तमन्नाच्या छातीत गोळी मारली. त्यानंतर घाबरलेल्या नसीमने स्वतःच्या कपाळावर बंदूक ठेवून गोळी चालवली. यातच त्याचा मृत्यू झाला. गोळीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पती-पत्नीला रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.