Fortuner Accident News : अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचं एक सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्हिडिओत कार चालकाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. एका फॉर्च्युनर कारने 70 वर्षांच्या वृ्द्धाला एकदा नाही तर दोनदा चिरडलं. उत्तर प्रदेशमधल्या झाशी (Jhansi) इथल्या सीपरी बाजार परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. इथल्या एका छोट्या गल्लीत फॉर्च्युनर कारने या 70 वर्षांच्या अंगावर गाडी घातली. गल्लीत दुतर्फा कार उभ्या होत्या. यावेळी फॉर्च्युनरच्या चालक रिव्हर्समध्ये गाडी घेऊन आला. पण त्याचवेळी त्याने मागे उभ्या असलेल्या एका वृद्धाला धडक दिली.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
झाशीतल्या अपघाताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक टोयोटा फॉर्च्युनर चालक गाडी मागे घेत असताना एका वृद्धाला धडक देतो. या धडकेत वृद्ध जमिनीवर कोसळतो. पण कार चालक त्याच्या अंगावरुन गाडी मागे घेतो. वृद्ध जिवाच्या आंकताने ओरडताना दिसतोय. पण त्या कारचालकाला आपल्या गाडीखाली माणूस चिरडला जातोय याची साधी कल्पनासुद्ध नाहीए. त्याच परिस्थितीत कार मागे घेत वृद्धाला अक्षरश फरफटत नेताना दिसतोय.
इतकं होऊनही फॉर्च्युनर चालकाला कोणताही अंदाज आला नाही. काही वेळ कार रिव्हर्स घेतल्यानंतर कसा बसा वृद्ध माणून बाहेर पडतो. तो सावरणार इतक्या पुन्हा कारचालक गाडी पुढे घेतो आणि पुन्हा त्या वृद्धाच्या अंगावरुन गाडी पुढे नेताना दिसतोय. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव राजेंद्र गुप्ता असल्याचं समोर आलं आहे.
जिवाच्या आकंताने ओरडा
अपघातात जखमी झालेला वृद्ध जोरजोरात ओरडताना या व्हिडिओत ऐकायला मिळतंय. पण कारचालकाला त्याचा आवाज ऐकू आला, नाही त्या वृद्धाच्या अंगावर गाडी नेल्याचा अंदाज आला. सुदैवाने रस्त्यावरुन जाणाऱ्या काही नागरिकांनी वृद्धाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनेच्या दिशेने धाव घेतली. जमावाने फॉर्च्युनर कार थांबवत वृद्धाला कारच्या खालून बाहेर काढलं. यात वृद्ध राजेंद्र गुप्ता जबर जखमी झाले. काही लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. तसंच वृद्ध व्यक्ती उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Warning: Disturbing video
In UP's Jhansi, a SUV can be seen driving in reverse over an elderly man. The victim was dragged with the SUV for few meters before it stopped and the drriver again drove over the man writhing in pain on the street. pic.twitter.com/4yOzZYjDWR
— Piyush Rai (@Benarasiyaa) May 24, 2024
जखमी वृद्ध व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फॉर्च्युनर कार चालकावर बेजबाबदारपणे गाडी चालवण्याचा आणि एका व्यक्तीला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
16/1(9 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.