'पीएम मोदी, योगी माझे भाऊ' Seema Haider ने पाठवली राखी... Video जारी करत म्हटलं 'जय श्रीराम'

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरचा एका नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सीमाने पीएम नरेंद्र मोदी, गृहीमंत्री अमित शहा आणि सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना राखी पाठवली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी आपण पाठवलेली राखी या नेत्यांनी मनगटावर बांधावी अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 22, 2023, 05:52 PM IST
'पीएम मोदी, योगी माझे भाऊ' Seema Haider ने पाठवली राखी... Video जारी करत म्हटलं 'जय श्रीराम' title=

Seema Haider : तीज आणि नागपंचमीचा सण साजरा केल्यानंतर आात पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) आणखी एक भारतीय सण साजरा करण्याच्या तयारीला लागली आहे. अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधनाचा सण येऊन ठेपला आहे. सीमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यास दिग्गज नेत्यांना राखी पाठवली आहे. याचा एक व्हिडिओ तीने शेअर केला आहे. व्हिडिओत तीने पोस्टाची पावतीही दाखवली आहे. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह, उत्तप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे माझे भाऊ आहेत. मी त्यांना राखी पाठवली आहे. लहान बहिण समजून माझ्या राखीचा स्विकार करावा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी पाठवलेली राखी हातावर बांधावी असं तीने या व्हिडिओत म्हटलं आहे.

वकिल एपी सिं यांनाही राखी बांधायची असल्याचं सीमाने म्हटलं आहे. एपी सिंह मे माझ्या मोठ्या भावासारखे असल्याचं तीने म्हटलंय. तसंच या व्हिडिओत सीमा हैदरने जय श्री राम आणि हिुदुस्तानचे नारेही लगावले आहेत.

रक्षाबंधनाआधी सीमा हैदरने तीज आणि नागपंचमीचा सणही साजरा केला होता. नोएडातल्या रबूपुरा इथल्या आपल्या घरी सीमाने विधीवत पूजा पाठ करत नागपंचमीचा सण साजरा केला. सीमा आणि सचिनने आपल्या चार मुलांसह महादेवाची पूजा केली. त्यानंतर भिंतीवर नागचं चित्र काढलं. याची पूजा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

याआधी सीमाने गणपती आणि इतर देवतांचीही आरती केली होती. याशिवाय 15 ऑगस्टला सीमाने आपल्या मुलांसह स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. यावेळी सीमाने हिंदुस्तानी बनली होती. यावेळीही तीने जय श्रीराम आणि जय हिंदुस्तानचे नारे दिले होते. 

मुळची पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान इथे राहाणारी सीमा आपल्या पतीला सोडून चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात आली. पबजी खेळताना भारतातल्या सचिनबरोबर तीचे प्रेमसंबंध जुळले आणि प्रेमासाठी तीने पाकिस्तानची सीमा ओलांडली. सीमा भारताात आल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. भारतीय सुरक्षादलाकडून तिची चौकशीही झाली. आपण पाकिस्तानला परत जाणार नसल्याचं सीमाने ठामपण सांगितलं आहे. सध्या सीमा भारतीय संस्कृतीच्या रंगात रंगली आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओत डोक्यावर सिंदूर आणि टिकली लावलेली दिसते. याशिवाय तुलसी पूजा करतानाही ती दिसते.