नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यातले वाद चव्हाट्यावर आल्यानं आता केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण कारवाई केलीय. संचालक आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर लाचखोरीच्या आधीच गुन्हा दाखल करण्यात आलाय. एम. नागेश्वर राव यांच्याकडे सीबीआयच्या संचालकपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आलीय.
सध्या एम नागेश्वर राव सीबीआयमध्येच संयुक्त संचालक पदावर कार्यरत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर सीबीआय हेडक्वार्टर स्थित आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांचं ऑफिस सील करण्यात आलंय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याप्रकरणात लक्ष घातल्याची सूत्रांची माहिती आहे लाचोखोरीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या राकेश अस्थाना आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांवर ३ कोटी ८८ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तिकडे अस्थाना यांनीही आलोक वर्मांवर लाचखोरीचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर कालरात्री सीबीआयच्याच विशेष पथकानं सीबीआयच्याच मुख्यालयावर छापे घातले.
या कारवाईनतंर आज सकाळी मुख्यालयत सील करण्यात आलं असून सीबीआयच्या कर्मचाऱ्यांनाही आत प्रवेशाला मनाई करण्यात आलीय़.