What About Transaction Fail while Payment: गेल्या काही वर्षात भारतात डिजिटल पेमेंटचं प्रमाण वेगानं वाढलं आहे. रोखीने व्यवहार करण्याऐवजी लोकं डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत आहेत. युपीआय म्हणजेच युनिवाइड पेमेंट इंटरफेस वापरून बँकेत पैसे ट्रान्सफर करणं सोपं झालं आहे. UPI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केले आहे. या संपूर्ण यंत्रणेचे नियंत्रण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हाती आहेत. पण डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत.
व्यवहार अयशस्वी होण्याची अनेक कारणे असू शकतात. व्यवहार मर्यादा ओलांडल्याने ट्रान्सक्शन फेल होऊ शकतं. कधीकधी खात्यात पैसे कमी असल्याने व्यवहार पूर्ण होत नाही. पण अनेकदा सर्वकाही व्यवस्थित असताना खात्यातून पैसे कापले जातात. अशा परिस्थितीत काही लोकांना त्यांचे पैसे मिळतील की नाही, अशी भीती वाटते. सहसा, अशा प्रकरणांमध्ये, कापलेले पेमेंट काही मिनिटांत खात्यात परत केले जाते. कधीकधी जास्त वेळ पण लागू शकतो. पण तासाभरानंतरही पैसे परत आले नाहीत, तर तुम्ही UPI अॅपवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला पेमेंट हिस्ट्री या पर्यायावर जावे लागेल. इथे तुम्हाला Raise Dispute वर जावे लागेल. तुमची तक्रार Raise Dispute वर नोंदवा. यानंतरही पैसे परत न झाल्यास बँकेशी संपर्क साधावा. परंतु एका महिन्याच्या आत बँकेकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, तुम्ही RBI च्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत तक्रार करू शकता.
बातमी वाचा- CIBIL Score खराब असल्याने लोन मिळवण्यात अडचण! जाणून घ्या आता काय कराल
तुम्ही दुसर्या खात्यात पैसे ट्रान्सफर केल्यानंतर रक्कम कापली जाते. परंतु व्यवहार पेंडिंग दाखवत असेल. म्हणजेच रक्कम इतर खात्यात पोहोचली नसेल, तर याचा अर्थ असा होतो की लाभार्थी बँकेच्या काही समस्येमुळे व्यवहार प्रलंबित आहे. त्याला पेमेंट 48 तासांत मिळेल. बँकेकडून डेली सेटलमेंटनंतर व्यवहार पूर्ण होतो.