UPSC 2020 परीक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला

शुभम कुमारने परीक्षेत प्रथम तर जागृती अवस्थी महिला उमेदवारांमध्ये अव्वल 

Updated: Sep 24, 2021, 07:42 PM IST
UPSC 2020 परीक्षेचा निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला title=

नवी दिल्ली : यूपीएससीने सिव्हील सेवा परीक्षा, 2020 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. नियुक्तीसाठी एकूण 761 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. शुभम कुमारने परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून बी.टेक (सिव्हिल इंजिनिअरिंग) मध्ये पदवी घेतली आहे. जागृती अवस्थी महिला उमेदवारांमध्ये अव्वल आहे. तिने MANIT भोपाळमधून B.Tech (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) मध्ये पदवी घेतली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) म्हटले आहे की, पहिल्या 25 उमेदवारांमध्ये 13 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे त्यात बेंचमार्क अपंगत्व असलेल्या 25 लोकांचा समावेश आहे. यामध्ये 7 ऑर्थोपेडिकली अपंग, 4 अंध, 10 मूकबधीर आणि 4 अनेक अपंगत्व असलेल्यांचा समावेश आहे.