18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार, 'या' सरकारचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय 

Updated: Apr 21, 2021, 12:43 PM IST
18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार, 'या' सरकारचा निर्णय title=

नवी दिल्ली : 1 मेपासून देशभरातील 18 वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी लसीकरण खुले केले जाणार आहे. दरम्यान उत्तरप्रदेश सरकारने (UP Government) एक आनंदाची बातमी दिलीय. योगी सरकारने 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतलाय. उत्तरप्रदेश राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) करोना पॉझिटिव्ह असून ते विलगीकरणात आहेत.

दरम्यान उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.

यूपीत लॉकडाऊन (Uttar Pradesh Lockdown) लावण्यास योगी सरकारने नकार दिलाय. यूपीतील 5 शहरात लॉकडाऊनचे लावण्याचे निर्देश अलाहाबाद हायकोर्टाने (Alahabad High Court) दिले आहेत. पण उपजिवीकेचं कारण पुढे करत यूपी सरकारने लॉकडाऊनला विरोध केलाय. यूपीत गेल्या 24तासातं 30 हजार 596 नवे रुग्ण आढळलेयत.

उत्तरप्रदेशातल्या 5 शहरामध्ये लॉकडाऊनचे निर्देश अलाहबाद हायकोर्टानं दिले. पण योगी सरकारनं जीवनासोबतच उपजिवीकाही महत्त्वाची आहे असं म्हणत लॉकडाऊनला विरोध केलाय. कुंभ मेळ्यानंतर उत्तरप्रदेशात रुग्ण झपाट्यानं वाढलेयत. 24 तासात 30 हजार 596 रुग्ण वाढलेयत. तर एका दिवसात 167जणांचा बळी गेला.तर लखनऊमध्ये 24 तासात 22 जणांनी जीव गमावला.

रामनवमीसाठी भक्तांना बंदी

अयोध्येत रामनवमीसाठी भक्तांवर बंदी घालण्याचा निर्णय यूपी सरकारने घेतलाय. रुग्ण संख्येतल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय. राम जन्मभूमी परिसरात भक्तांना मनाई करण्यात आलीय. तसेच  सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेयत.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचने हा निर्णय घेतलाय. त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. साधुसंत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं भक्तांना अयोध्येत न येण्याचं आवाहन केलंय.