लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणाऱ्या महिला पोलिसाने आरोपी पोलिसासोबत संसार थाटला

ज्या पोलिसाविरोधात तिने लैंगिक अत्याचारीची तक्रार...त्याच्याशीच बांधली महिला पोलिसानं लगीनगाठ 

Updated: Aug 27, 2021, 06:29 PM IST
लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करणाऱ्या महिला पोलिसाने आरोपी पोलिसासोबत संसार थाटला title=

अलाहबाद: पासपोर्ट सेलमध्ये तैनात असलेल्या महिला पोलीसने एसएसपीच्या फोटोग्राफी सेलमध्ये काम करणाऱ्या पोलिसाविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तक्रार दाखल करणाऱ्या महिला पोलिसाने आरोपी पोलिसाविरोधात संसार थाटला. या दोघांच्या लग्नाचा फोटो व्हायरल होत आहे. 

या महिला पोलिसाने काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. एसएसपीच्या फोटोग्राफी सेलमध्ये काम करणाऱ्या पोलीस अजय ( मूळ नाव बदललं आहे) वर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. महिला पोलिसाच्या म्हणण्यानुसार आरोपीने आधी तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याचं घरी येणं-जाणं सुरू झालं. एक दिवस पोलीस क्वार्टरमध्ये आरोपीने तिला ड्रिंग प्यायला दिलं. त्यानंतर त्याने लैंगिक शोषण केलं त्याचा व्हिडीओ केला.

आरोपीने लग्नाचं वचन दिलं होतं मात्र तो आपल्या शब्दापासून फिरला. शिपाई महिला पोलीसने खूप प्रयत्न केले तेव्हा ते निष्फळ ठरले. अखेर महिलेनं न्याय मिळवण्यासाठी कर्नलगंज पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस अजय विरोधात तक्रारही दिली. 

या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी फरार झाला. बुधवारी अचानक शिपाई महिला पोलीस आणि अजय यांच्या लग्नाचा फोटो समोर आला. या प्रकरणावर सध्यातरी दोघांनी मौन बाळगल्याचं दिसत आहे. तर कर्नलगंज पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लग्नामुळे एफआयआऱवर कोणताही फरक पडणार नाही. या दोघांच्या लग्नामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार हे नक्की.