नूडल्स खाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांची प्रकृती गंभीर, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू...काय घडलं नेमकं?

India News : या कुटुंबाने घराजवळच्या एका दुकानात नूडल्स विकत आणले आणि घरातील सर्वांना नूडल्स बनवून खाल्ले. यानंतर सर्वांची तब्येत बिघडली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 

राजीव कासले | Updated: May 13, 2024, 05:02 PM IST
नूडल्स खाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांची प्रकृती गंभीर, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू...काय घडलं नेमकं? title=

India News : नूडल्स खाल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा प्रकृती अचानक बिघडली. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. फूड पॉयजनिंगमुळे (Food Poisoning) या सर्वांची प्रकृती बिघडल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. अन्न विभागाच्या (Food Department) अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. परिसरातील इतर लोकांनीही नूडल्स (Noodles) खाल्ल्याचे अन्न विभागाने सांगितले. पण यातल्या कोणाची तब्येत बिघडली नाही. ज्या कुटुंबाने नूडल्स खाले, त्यांनी याबरोबर आणखी काही तरी खाल्लं असावं असं अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

काय आहे नेमकी घटना?
उत्तर प्रदेशमधल्या पीलीभीत इथली ही घटना आहे. स्थानिकांनी दिलेल्य माहितीनुसार पूरनपुर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या राहुल नगर चंदिया हजारा गावात एका कुटुंबाने गुरुवारी रात्री जेवणात नूडल्स आणि भात खाल्ला. त्यानंतर कुटुंबातील तीन मुलांसह सहा जणांची तब्येत बिघडली. शेजारच्यांनी या सहा जणांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात भरती केलं. उपचारानंतर या सर्वांना घरी पाठवण्यात आलं. पण घरी आल्यावर त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. कुटुंबातील 12 वर्षांचा मुलगा रोहनने घरी आल्यानंतर पाणी प्यायला. पोट दुखत असल्याने तो बेडवर झोपला. पण काही वेळातच रोहनचा मृत्यू झाला. 

रोहनच्या मृत्यूने कुटुंबात खळबळ उडाली. कुटुंबातील इतर पाच जणांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु केले. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेवणात खाण्यातून काहीरी त्यांच्या पोटात गेलं, यामुळे 12 वर्षांच्या रोहनचा मृत्यू धाला. आरोग्य केंद्राचे डॉक्टर रशीद यांनी सांगितले की, शनिवारी पाच जणांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारीनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दुसरा मुलगा विवेकची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्याला बरेली जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आतं. इतर चौघांची प्रकृती स्थिर आहे.

अन्न विभागाचं स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणाची अन्नविभागाकडून चौकशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबाने घराजवळच्या एका जनरल स्टोर्समधून नूडल्स खरेदी केले होते. इतर काही लोकांनीही याच दुकानात नूडल्स खरेदी केले. पण या कुटुंबाव्यतिरिक्त परिरसरात राहाणाऱ्या इतर कोणाचीह नूडल्स खाल्याने तब्येत बिघडल्यीच तक्रार नाही. नूडल्स व्यतिरिक्त या कुटुंबाने इतर काहीतरी खाल्लं असावं ज्यामुळे त्यांना फूड पॉजनिंगचा त्रास झाला असावा असा अंदाज अन्न विभागाचे अधिकारी शशांक त्रिपाठी यांनी व्यक्त केला आहे. 

कुटुंबातील कोणीही या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली नसल्याची माहिती समोर आली आहे. मृत रोहनच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांना नेमका कशामुळे त्रास झाला हे समोर येईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.