Religion Conversion : धर्मांतराच्या एका धक्कादायक प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या जबाबात धक्कादायक खुलासे केले आहेत. ऑनलाईन कॅरम (Online Carrom) खेळताना त्यांनी रोहित नावाच्या एका मुलाला फसवलं. त्यानंतर त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. रेशमा नावाच्या मुलीशी त्याची ओळख करुन दिली. रोहित रेशमाच्या प्रेमात वेडा झाला. रेशमा हळुहळू त्याला नमाज पठण शिकवू लागली. तसंच त्याला रोजा ठेवण्यासही सांगण्यात आलं. रोहित तिची प्रत्येक गोष्ट ऐकू लागला. त्यानंतर लग्नासाठी त्याचं धर्मांतर करण्यात आलं.
उत्तरप्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये धर्मांतर (Religion Conversion) करण्याच्या आरोपाखाली तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एटीएसने ही कारवाई केली. हे तीन जण दुसऱ्या धर्मातील मुलांना हेरून त्यांना हनीट्रॅपमध्ये (Honeytrap) अडकवत होते. त्यानंतर त्या मुलांचं धर्मांतर केलं जात होतं. धक्कादायक म्हणजे यासाटी ऑनलाईन गेमचा वापर केला जात होता. ऑनलाईन कॅरम खेळता-खेळता ओळख वाढवून मुलांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढलं जात होतं.
अटक करण्यात आलेल्यांची नावं नाजिम हसन, मोहम्मद सादिक आणि अजहर अशी आहेत. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार सहारनपूर इथं राहणारे काही लोक दुसऱ्या धर्मातील लोकांची फसवणकू करुन धर्मांतरास भाग पाडत असल्याची माहिती मिळाली. यानंतर एटीएसने या तिघांवर पाळत ठेवली. या तिघांकडून सोशल साईटवर धर्मांविषयी काही गोष्टी टाकण्यात आल्या होत्या.
तिघांपैकी नाजिम हसन नावाचा व्यक्ती विविध आजारांवर औषध देण्याच्या बहाणाने लोकांच्या घरात प्रवेश मिळवत होता. अशीच संधी साधत त्याने सहारनपूरमधल्या एका व्यक्तीशी ओळख वाढवली आणि त्याच्या घरात प्रवेश केला. त्या व्यक्तिचा मुलगा रोहितबद्दल सर्व माहिती मिळवली. रोहितला ऑनलाईन कॅरम खेळण्याचा छंद होता. नेमकं हेच नाजिमने हेरलं. त्याने रेशमा नावाच्या मुलीला ऑनलाईन कॅरमच्या माध्यमातून ओळख वाढवण्यास सांगितलं.
रोहित आणि रेशमामध्ये बोलणं वाढलं. रेशमाने आपल्या प्रेमाचं जाळ रोहितवर फेकलं. यात रोहित पुरता अडकला. त्यानंतर रेशमाने रोहितला जवळच्या मशिदीत जाऊन नमाज पठण करण्यास सांगितलं. यासाठी त्याला नाजिमला भेटायला सांगितलं. नाजिम रोहितला नमाज पढायला शिकवलं तसंच रोजा ठेवण्यासही सांगितलं. इस्लाम धर्म स्विकारल्यास तुला नोकरी मिळेल असंही त्याला सांगण्यात आलं.
रेशमाशी लग्न करण्यासाठी रोहितने इस्लाम धर्म स्विकारला. यात सादिक आणि अझहरनेही नाजिमला साथ दिली. तीन आरोपींनी एटीएसच्या जबाबात आपला गुन्हा कबूल केला. रेशमा नावाच्या मुलीला अटक करण्यात आली नाही. वास्तविक हे फेक अकाऊंट असून ते पाकिस्तानमधून चालवलं जात असल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.