Breaking News: video..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश.. 6 जण ठार..

केदारनाथमध्ये  (kedarnath) गरूडचट्टी इथे हेलिकॉप्टर (helicoptor) कोसळल्याची घटना घडली आहे, हेलिकॉप्टरमधील 8 पैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झल्याची माहिती समोर येते आहे . (Uttarakhand News helicopter crash in kedarnath today ) केदारनाथपासून 2 किमी अंतरावर हेलिकॉप्टर कोसळलं. दरम्यान अपघात झालेल हेलिकॉप्टर हे खाजगी कंपनीचं (private helicoptor) असल्याचं कळतंय. सदर अपघातानंतर काही व्हिडीओ (video) समोर येत आहेत.

Updated: Oct 18, 2022, 02:25 PM IST
 Breaking News: video..केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश..  6 जण ठार.. title=

kedarnath helicopter crash incident : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी 11.40 वाजता हा अपघात झाल्याची माहिती सीईओ युकाडा सी रविशंकर यांनी दिली. मृतांमध्ये तीन प्रवासी गुजरातमधील, एक कर्नाटक, एक तामिळनाडू आणि एक झारखंडचा आहे. पायलट हा मुंबईचा रहिवासी आहे. (Uttarakhand News helicopter crash in kedarnath today)

अपघाताचा तपास डीजीसीए आणि केंद्राकडे सोपवण्यात येणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (president murmu on kedarnath incident) यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

हे हेलिकॉप्टर केदारनाथहून यात्रेकरूंना परत आणत असताना गरुडचट्टीजवळ हा अपघात झाला. दरम्यान,  (uttrakhand cm pushkar singh dhami)उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एसडीआरएफची  (SDRF) टीम घटनास्थळी पोहोचली आहे. (Uttarakhand News helicopter crash in kedarnath today)

केंद्रीय गृहमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे

केदारनाथ दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले की, 'केदारनाथला भाविकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या अपघाताची घटना अत्यंत दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.