स्पाईस जेटमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

स्पाईस जेटमध्ये भर्ती 

Updated: Sep 23, 2018, 04:34 PM IST
स्पाईस जेटमध्ये नोकरीची सुवर्ण संधी title=

पुणे : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. कारण स्पाईस जेटमध्ये केबिन क्रूसाठी भर्ती सुरु आहे. यासाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पुण्यामध्ये या पदासाठी मुलाखती होणार आहेत. कंपनीकडून सध्या फक्त महिसांसाठी ही केबिन क्रूची भर्ती होणार आहे.

इंटरव्यूला जाण्यापूर्वी 

स्पाईस जेट कंपनीत केबिन क्रू पदावर काम करण्यासाठी तुम्ही जर इच्छूक असाल तर तुम्ही थेट मुलाखतीसाठी जावू शकता. पुण्यात 28 सप्टेंबरला सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत क्राउन प्लाजा हॉटेलमध्ये या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करताना युवतींना त्यांचा बायोडेटा आणि एक पूर्ण फोटो कंपनीची वेबसाईट inflight.careers@spicejet.com वर पाठवावा लागणार आहे. मुलाखती दरम्यान तुम्हाला बायोडेटाची एक कॉपी सोबत आणावी लागणार आहे. सोबतच एक पूर्ण फोटो देखील आणावा लागणार आहे.

देशभरात भर्ती

स्पाइस जेट देशभरातून केबिन क्रू या पदासाठी भर्ती करत आहे. पुण्याच्या आधी कंपनीने दिल्लीमध्ये देखील थेट मुलाखती ठेवल्या आहेत. 24 सप्टेंबरला दिल्लीत या मुलाखती होणार आहे. कंपनीने याआधी कोलकाता आणि गुवाहाटीमध्ये ही थेट मुलाखती घेतल्या.