Valentine : 'एकतर्फी प्रेम...' उपमुख्यमंत्र्यांना पिंकीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु असून सोशल मीडियावर एका पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. बेरोजगार असल्याने प्रेम व्यक्त करता येत नसल्याची खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे

Updated: Feb 9, 2023, 08:04 PM IST
Valentine : 'एकतर्फी प्रेम...' उपमुख्यमंत्र्यांना पिंकीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल title=

Valentine Day : प्रेमाचा सण म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आपल्या जोडीदावर प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी काही जण महागडी भेटवस्तू देतात. तर काही जण कागदावर आपल्या मनातील भावना उतरवतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) असंच एक लेटर (Letter) चांगलंच व्हायरल होत आहे. व्हायरल होणारं हे पत्र उपमुख्यमंत्र्यांना (Bihar DCM) लिहिलंय. पत्र लिहिणारी एका युवा लेखकावर एकतर्फी प्रेम (One Side Love) करते. पण आपण बेरोजगार (Unemployed) असल्याची खंत उपमुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्र व्यक्त केली आहे. 

उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांना पिंकी (Pinky) नावाच्या एका मुलीने हे पत्र लिहलं असून औरंगाबाद जिल्ह्यातील तरुण लेखक प्रभात बंधुल्या (Prabhat Bandhulya) यांच्यावर ती एकतर्फी प्रेम करते. या पत्रात तीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रभात बंधुल्या याने आपल्या लेखणीने भोजपूरी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

काय लिहिलंय त्या पत्रात?
डिअर तेजस्व. मी खूप तणावात आहे. तुम्ही स्वत: प्रेमविवाह (Love Marriage) केलात, पण आमच्या लग्नात बेरोजगारीचं संकट उभं राहिलंय. गेल्या चार वर्षांपासून मी प्रभात बांधुल्यवर एक तर्फी प्रेम करते. नोकरी मिळाली असती प्रभातला प्रपोज करण्याचा विचार होता. पण काही केल्या नोकरी मिळत नाहीए. एकतर कुठेही भरती नाही, भरती झालीच तर पेपरलीकची समस्या असते.

पुढे तीने आपल्या पत्रात म्हटलंय, ही परिस्थिती अशीच राहिली तर हा व्हॅलेंटाईन असाच जाईल असं वाटतंय. घरात माझ्या लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात झाली आहे. माझ्या सर्व मैत्रिणींची लग्न होऊन त्यांना मुलंही झाली. हा सगळा विचार करुन मन विषन्न झालंय. मोठ्या आशेने हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. काहीही करुन नोकरी मिळवून द्या. नोकरी मिळाली नाही तर लेखक महायश इतर कोणाबरोबर तरी फरार होतील आणि मग तोच आयुष्यात नसेल तर मग नोकरी मिळून काय फायदा? असं लिहित त्या मुलीने उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडे बेरोजगारीची व्यथा मांडली आहे. 

पत्रात तीने शेवटी म्हटलंय, आपली मतदार आणि लेखक प्रभात बांधुल्यची एकतर्फी प्रेयसी पिंकी फ्रॉम पटना.

बेरोजगाराचं विदारक चित्र
सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रभात बांधुल्यच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पिंकीचं पत्र ट्विटरसहित इतर सोशल नेटवर्किंग साईटवर ट्रेंड होतंय. याबाबत प्रभात बांधुल्य यांना विचारलं असता त्यांनी आपण कोणत्याही पिंकीला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. प्रभात बांधुल्य हे अॅडव्होकेट आहे, आणि सोबतच ते तरुण लेखकही आहेत. त्यामुलीने माझ्या नावाचा उल्लेख करत पत्रात बेरोजगारीचं विदारक चित्र मांडलं असल्याचं प्रभात बांधुल्य यांनी म्हटलंय. 

बेरोजगारीची ही कहाणी केवळ पिंकाचीची नाही तर संपूर्ण बिहारची असल्याचं प्रभात यांनी म्हटलंय. पिंकीला प्रेमाची नाही तर रोजगाराची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारमधल्या बेरोजगारांची उपममुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ते नक्कची यावर काहीतरी तोडगा काढतील असं प्रभात बांधुल्य यांनी म्हटलं आहे.