VIDEO : शेळी खाल्ल्यानंतर १५ फूट अजगराची अशी वाट लागली

अशात देशभरात सांप आणि अजगर यांचे काही फोटो, व्हिडीओ येत आहेत. यात अजगरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Jun 17, 2017, 09:06 PM IST

गुवाहाटी : पावसाळा सुरू झाल्यानंतर साप आणि अजगरांचं बाहेर येणं सुरू होतं, अशात देशभरात सांप आणि अजगर यांचे काही फोटो, व्हिडीओ येत आहेत. यात अजगरचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल ही एका महाकाय अजगराचं पोट फुगलं आहे, कारण अजगराच्या पोटात संपूर्ण शेळी आहे, पोटात एक पूर्ण शेळी असल्याने अजगर चालूही शकत नाही.

ही घटना आसामच्या बैहता चरियल गावाची आहे. अजगराला गाववाल्यांनी चारही बाजूने घेरलं आहे, आणि त्याचे फोटो देखील ते घेत आहेत. गाववाल्यांनी हा अजगर १५ फुटांचा असल्याचं म्हटलं आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, अजगराजवळ जंगलातून गावात आला, आणि संपूर्ण शेळीच त्याने गिळली. गाववाल्यांनी त्याला याच दोरीने बांधलं कारण त्याला जंगलात परत सोडता येईल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, गाववाल्यांनी त्याला दोरीने बांधून नियंत्रणात आणलं आहे,  लोकांनी अजगराला असं बांधल्याने ही क्रृरता असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.