VIDEO: हा व्हिडीओ पाहून तुम्ही नूडल्स खायचं सोडून द्याल

भूक लागली असेल आणि झटपट काहीतरी तयार करुन खाण्याची इच्छा असेल तर अनेकदा नूडल्सला पसंती दिली जाते. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यापुढे नूडल्स खाताना तुम्ही अनेकदा विचार कराल.  

Updated: Jan 20, 2023, 11:17 AM IST
VIDEO: हा व्हिडीओ पाहून तुम्ही नूडल्स खायचं सोडून द्याल title=

Video Of Noodles Being Made In Factory: भूक लागली असेल आणि झटपट काहीतरी तयार करुन खाण्याची इच्छा असेल तर अनेकदा नूडल्सला पसंती दिली जाते. पावसाळा असो किंवा हिवाळा...दोन मिनिटात तयार होणारे नूडल्स हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ आहे. त्यातही नूडल्स बनवताना तुम्ही त्यात वेगवेगळे प्रयोगही करु शकता. पण अनेकांना नूडल्स घरी खाण्यापेक्षा बाहेर हॉटेल किंवा रस्त्यावर खाणं आवडतं. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यापुढे नूडल्स खाताना तुम्ही अनेकदा विचार कराल.

या व्हिडीओत कामगार कशाप्रकारे नूडल्स तयार करत आहेत हे दिसत आहे. यावेळी तिथे कोणत्याही प्रकारची स्वच्छता नसून, कामगार अत्यंत बेफिकीरपणे काम करत असल्याचं दिसून येतं. हातामध्ये कोणतेही ग्लोव्ह्ज, ना कोणतीही स्वच्छता असणाऱ्या या फॅक्टरीत घाणेरड्या फरशीवर नूडल्स टाकले जात असून नंतर ते तसेच पिशवीत भरले जात असल्याचंही दिसत आहे. 

हा व्हिडीओ एका ट्वीटर युजरने शेअर केला आहे. "तुम्ही शेवटचं रस्त्यावर चायनीज हक्का नूडल्स कधी खाल्लं होतं?," असं कॅप्शन त्याने व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. काहींनी उपहासात्मकपणे नूडल्स बनवण्याची सर्वाच स्वच्छ प्रक्रिया असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने दिल्लीमधील अनेक स्वयंपाकघरात समान स्थिती असेल याची १०० टक्के खात्री असल्याचं सांगितलं आहे. तर एका युजरने आपण खातो तो अन्न कसं तयार होतं हे पाहिलं तर अनेक पदार्थ खाणं बंद करावं लागेल असं म्हटलं आहे. 

काहींनी हे नुडल्स फक्त रस्त्यावर विकण्यासाठीच तयार होत आहेत आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये दिलं जाणार नाही हे ठामपणे कसं काय सांगू शकतो अशी विचारणा केली आहे. काहींनी तर नूडल्स नंतर गरम करत असल्याने जास्त काही समस्या उद्भवणार नाही असं म्हटलं आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही रस्त्यावर मिळणारे नूडल्स खाणार का?