viral video: शेतातलं काम सोडून शेतकऱ्यानं दिली अफलातून पोझ, मिशीला पीळ देत म्हणाला, ''अब निकाओ फोटो!''

Viral Video: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (videos) हे व्हायरल होत असतात. या व्हिडीओ मध्ये फारसं काही पाहण्यासारखं नाही असं आपल्याला वाटतं परंतु असे अनेक व्हिडीओज (old man with moustache video) असतात जे पाहून झाल्यावर आपल्यााला ते परत परत पाहावेसे वाटतात त्यामुळे असे व्हिडीओज हे तूफान व्हायरल होत असतात. 

Updated: Dec 24, 2022, 04:35 PM IST
  viral video: शेतातलं काम सोडून शेतकऱ्यानं दिली अफलातून पोझ, मिशीला पीळ देत म्हणाला, ''अब निकाओ फोटो!'' title=
viral video

Viral Video: सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (videos) हे व्हायरल होत असतात. या व्हिडीओ मध्ये फारसं काही पाहण्यासारखं नाही असं आपल्याला वाटतं परंतु असे अनेक व्हिडीओज (old man with moustache video) असतात जे पाहून झाल्यावर आपल्यााला ते परत परत पाहावेसे वाटतात त्यामुळे असे व्हिडीओज हे तूफान व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे हा व्हिडीओ आहे एक वृद्ध शेतकऱ्याचा. हा व्हिडीओ पंजाबमधला (punjab video) आहे. सध्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे. एका युजरनं हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ काही वेळात लाखो लोकांपर्यंत पोहोचला आहे. तुम्ही म्हणाल की या व्हिडीओ एवढं काय आहे, परंतु या व्हिडीओ हा शेतकरी आपला फोटो काढून घेण्यासाठी उत्सुक होता आणि फोटोसाठी ज्या स्टाईलनं तो पोझ देत होतो ती स्टाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडीओ (video) तूफान व्हायरल झाला आहे. (video of old man with moustache goes viral people reacts with hearts)

या व्हिडीओला सगळ्यांकडूनच तूफान प्रतिसाद मिळत आहे. एकतर या व्हिडीओतली त्या वृद्ध शेतकऱ्याची स्टाईल लोकांना खूप आवडली आहे. त्यातून त्यांचा साधेपणा लोकांना फारसा भावला आहे. ते कोणी सेलिब्रेटी नाही किंवा कोणी मोठी व्यक्तीही नाही. परंतु त्यांच्या निरागस हास्यानं त्यांनी अनेकांची मनं जिंकून घेतली आहेत. एका रात्रीत एक साधा शेतकरी सोशल मीडियावर (old man wins heart) लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे. 

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की हे वृद्ध शेतकरी शेतात काम करताना दिसत आहेत. तेव्हा मध्येच एक फोटोग्राफर येतो आणि त्यांना विचारतो की तुमचा एक फोटो काढू का? तेव्हा ते म्हणतात की का नाही, काढा ना. त्यानंतर ते आपलं शेतातलं काम सोडून आपले कपडे व्यवस्थित करतात. मग आपली मोठी पांढरी अशी मिशी पळून ती नीट करतात आणि मग म्हणातात, हा आता काढा फोटो. त्यानंतर ते खुशीत आपला फोटो काढून मोकळे होतात. तो फोटोग्राफर मग त्यांना त्यांचा फोटो काढून देतो आणि तेही मग आनंदानं आपल्या फोटोकडे पाहतात. आपला इतका सुंदर फोटो पाहून त्यांना खूप आनंद होतो आणि बराच वेळ ते आपला फोटो न्याहाळत राहतात. शेवटी तो फोटोग्राफर त्यांना विचारतो की तुम्हाला तुमचा हा फोटो कसा वाटला त्यावर ते म्हणतात 'बडिया'. 

लोकांना त्यांची हीच स्माईल खूप जास्त आवडते आणि क्षणार्धात हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होतो. हा व्हायरल व्हिडिओ सुतेज पन्नू नावाच्या इन्स्टाग्राम (instagram) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अपलोड केल्यानंतर आत्तापर्यंत 30 लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.  या व्हिडीओला तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर हजारो लोकांनी यावर कमेंट्सही केल्या आहेत. या व्हिडीओमधल्या वृद्ध शेतकऱ्याची स्माईल पाहून लोकांनी त्यांना मिलियन डॉलर स्माईल असं म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये फोटोग्राफर आणि शेतकऱ्याची बॉण्डिंगही लोकांना खूप आवडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनेकांनी म्हणूनच या व्हिडीओला हृदयस्पर्शी, विनम्रतेचं उदाहरण अशा उपमा देत आहेत. तर काहींनी साधेपणानं मनं जिंकली असल्याचं म्हणतायत.