मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी ट्रेनने प्रवास केला आहे. प्रवासा दरम्यान आपल्यापैकी प्रत्येक लोकांना हा प्रश्व पडला असणार की, रुळावरुन ही ट्रेन कशी चालवली जाते? ड्रायव्हर ट्रेनला कसे चालवतात? स्टेयरिंग शिवाय ट्रेन कशी वळते किंवा वेगात ट्रेन असताना तिला कसे नियंत्रित केले जाते? लोकांना ड्रायव्हरच्या केबिनमध्ये वातावरण कसे असते आणि ते कसे काम करतात हे पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आज आम्ही एका व्हीडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.
आम्ही ज्या व्हीडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगणार आहोत, तो व्हीडिओ केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शेअर केला आहे, त्यात हे ट्रेन ड्रायव्हर एकमेकांना सिग्नल देत ट्रेन चालवताना तुम्ही पाहू शकता. या ट्रेनमधून ऑक्सिजन वाहून आणला जात आहे. जेव्हा देशात ऑक्सिजनचा अभाव होता, तेव्हा रेल्वेने अनेक ठिकाणी ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचवले आणि लोकांचे प्राण वाचले आहे.
तुम्ही या व्हीडिओमध्ये पाहू शकता की, ट्रेन चालवत असताना दोन्ही ट्रेन ड्रायव्हर एकमेकांशी समन्वय साधत आहेत आणि सिग्नल विषयी एकमेकांना माहिती देत आहेत. ते एका लिवरद्वारे संपूर्ण ट्रेनला नियंत्रणात ठेवत आहेत. तुम्हाला हा व्हीडिओ पाहूण कळेल की, या ट्रेन ड्रायव्हरच काम किती जबाबदारीचे आहे. कारण, त्यांच्यावर अनेक लोकांचे प्राण अवलंबून असते. त्यांना कोठेही त्यांचे लक्ष विचलीत न करता आपली जबाबदारी पार पाडावी लागते.
#OxygenExpress trains have achieved a milestone of delivering 25,000 MT of oxygen in service to the Nation via Green Corridors by ensuring timely & swift movement of life-saving oxygen for COVID-19 patients. pic.twitter.com/kNCwkzsUrN
— Piyush Goyal (@PiyushGoyal) June 5, 2021
आपल्याला कधी कधी असाही प्रश्न पडतो की, 2 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस ट्रेन चालत असेल, तेव्हा जर ड्रायव्हर चुकून झोपला तर? ट्रेनचं काय होईल? ट्रेनचा अपघात होईल का? परंतु असे काही होणार नाही कारण, पहिले तर ट्रेनमध्ये दोन ड्रायव्हर असतात. त्यामुळे एक ड्रायव्हर जरी झोपला तरी दुसरा ड्रायव्हर संपूर्ण ट्रेन चालवण्यासाठी सक्षम असतो.
समजा जरी दोन्ही ड्रायव्हर झोपले तरी ट्रेनला अपघात होणार नाही कारण, ड्रायव्हर ट्रेन चालवताना कुठल्याही प्रकारची कामे करत असतील तर ते सर्व इंजिनला अलर्ट मिळत रहाते. हे असे घडते कारण ट्रेनमध्ये Dead Man’s Lever हे खास डिव्हाइस असते. जे ड्रायव्हरला प्रत्येक 2-3 मिनिटांनी दाबत रहावे लागते. जर त्याला ड्रायव्हरने 2-3 मिनिटांमध्ये दाबले नाही तर, ट्रेनच्या इंजिनला ड्रायव्हरकडून कोणतेही नोटिफिकेशन मिळत नाही. ज्यामुळे ट्रेनच्या इंजिनची स्पीड कमी होते. त्यामुळे ट्रेन थोड्याच वेळात थांबते.
आपण व्हीडीओमध्ये पाहिले आहे की, ट्रेनमध्ये स्टीयरिंग नसते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडेल की, ट्रेनला ड्रायव्हर्स कसे काय फिरवतात? त्याचे कारण हे आहे की, ट्रेनचे टायर्स ट्रॅकमध्ये सेट असतात. टायरच्या आतल्या ट्रॅकचा भाग थोडा मोठा असतो, ज्यामुळे ट्रेनचे चाक त्या ट्रॅकला घट्ट धरुन ठेवतात. अशा स्थितीत ट्रॅक जसा असतो, त्याला धरुनच ट्रेन चालते. त्याला फिरवण्यासाठी स्टेअरिंगची आवश्यकता नसते.
परंतु ट्रॅकच्या मध्यभागी तेथे एक लोखंडी छोटी पट्टी असते, ती येणार्या ट्रेनला दिशा देण्याचे काम करते. ती किंचित फिरवलेली असते. म्हणून जर ट्रेनला दुसर्या ट्रॅकवर हलवायचे असेल, तर ही पट्टी ट्रेनला ट्रॅक बदलायला मदत करते आणि ट्रेनची दिशा बदलते.