न्यायालयाकडे माझी संपत्ती जमा करण्यास मी तयार: विजय माल्ल्या

विजय माल्लाने आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिलं आहे.

Updated: Jul 9, 2018, 12:54 PM IST
न्यायालयाकडे माझी संपत्ती जमा करण्यास मी तयार: विजय माल्ल्या

नवी दिल्ली: कर्ज बुडवून भारतातून पळून गेलेला मद्यसम्राट विजय माल्ल्या इंग्लंडमधील आपली संपत्ती वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. ब्रिटन न्यायालयाने मालमत्ता जप्तीचे आदेश दिल्यानंतर माझ्या नावावर संपत्ती नसल्याचं सांगत कर्जबुडव्या विजय माल्ल्याने हात वर केलेत. त्यामुळे बँकांच्या हाती काहीच लागणार नाही अशा तोऱ्यात विजय माल्ल्याने पुन्हा एकदा डिवचलंय. 

माझ्याकडे फक्त गाड्या आणि आभूषणंच

विजय माल्लाने आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिलं आहे. त्यात काही गाड्या आणि आभूषणांची नोंद आहेत आणि ही संपत्ती मी स्वता कोर्टात जमा करण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त काहीच मिळणार नसल्याचं कर्जबुडव्या विजय माल्याने सांगितलंय.

माल्ल्यावर कोणत्या बँकांचं किती कर्ज?

(आकड्यांमध्ये बदल शक्य)

  • एसबीआय : १६०० कोटी
  • पंजाब नॅशनल बँक : ८०० कोटी
  • आयडीबीआय बँक : ८०० कोटी
  • बँक ऑफ इंडिया : ६५० कोटी
  • बँक ऑफ बडोदा : ५५० कोटी
  • युनायटेड बँक ऑफ इंडिया : ४५० कोटी